Premanand Maharaj file photo
अपडेट्स

Premanand Maharaj : डाव्या हातावर भगवंताचा टॅटू बनवणाऱ्याला संत प्रेमानंद महाराजांचा सल्ला, म्हणाले.. हा तर...

यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Premanand Maharaj: Saint Premanand Maharaj Offers Advice to a Man Who Got a Tattoo of God on His Left Hand

मथुरा : पुढारी ऑनलाईन

प्रेमानंद महाराज यांनी शरीरावर भगवंताचे नाव टॅटू करून घेणाऱ्यांना तसे न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, असे केल्याने अपराध होण्याची शक्यता असते.

आजच्या काळात शरीरावर टॅटू काढणे हे तरुणांमध्ये खूप कूल आणि ट्रेंडी मानले जाते. काही लोक हातावर देवाचे नावही टॅटू म्हणून गोंदवून घेतात. वृंदावनचे प्रख्यात आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांनी हे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, भगवंताचे नाव किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी शरीरावर टॅटू स्वरूपात बनवणे योग्य नाही. यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एक भक्त आपल्या कुटुंबासह महाराजांच्या दर्शनासाठी उभा आहे. त्यावेळी प्रेमानंद महाराज म्हणतात, “तुमच्या डाव्या हातावर महादेवाचे नाव टॅटू आहे. हा हात शौच करताना वापरला जातो. आंघोळ करताना याच हाताचे पाणी पायांवरही जाते. त्यामुळे कुठेतरी अपराध होण्याची शक्यता निर्माण होते. आम्ही सांगतो की भगवानाचे नाव टॅटू स्वरूपात करू नये, कारण ते योग्य नाही. तुम्ही त्रिशूलऐवजी त्‍या ठिकाणी फुलाचा डिझाइन बनवा आणि जिथे ‘महादेव’ लिहिले आहे तिथे काही सामान्य चित्र बनवा. आमच्या सल्ल्याने एकदा तसे करून पाहा.”

“हे चालेल, हे काढण्याची गरज नाही”

यानंतर त्यांनी त्या भक्ताला विचारले की दुसऱ्या हातावर काय टॅटू आहे. त्यावर उत्तर मिळाले – “Blessed”. यावर महाराज हसत म्हणाले, “हे चालेल, हे काढण्याची गरज नाही.” त्यांच्या या उत्तरामुळे तेथे उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्या भक्तानेही पुढच्या भेटीत टॅटू बदलून येण्याचे आश्वासन दिले.

कोण आहेत प्रेमानंद महाराज?

प्रेमानंद महाराज यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी देश-विदेशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती वृंदावनला येतात. ते श्रीहित राधा केलिकुंज आश्रमाचे संचालन करतात. त्यांचे मूळ नाव अनिरुद्ध कुमार पांडेय असून ते कानपूरचे रहिवासी आहेत. क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हेही अनेकदा त्यांच्या आश्रमात दर्शनासाठी येतात. लहानपणापासूनच त्यांचा ईश्वरभक्तीकडे कल होता आणि अवघ्या १३व्या वर्षी त्यांनी घर सोडून ईश्वराच्या शोधात प्रस्थान केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT