पुढारी ऑनलाईन डेस्क : क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री अनन्या सोनी हिच्या दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत. अनन्या सोनी हिने क्राईम पेट्रोल मालिकेत काम केलं आहे. अनन्या सोनी हिला तिच्या वडिलांनी एक किडनी डोनेट केली होती. सोनी मागील ६ वर्षांपासून एका किडनीवर जगत आहे. ती म्हणाली, अशी परिस्थिती ओढावेल, असा कधीचं विचार केला नव्हता.
ती किडनी ट्रांसप्लांटचे नियोजन करत आहे. यासाठी तिने आर्थिक मदत मागितली आहे.
अधिक वाचा –
अनन्या सोनीने नामकरण, क्राईम पेट्रोल, इश्क में मरजावां मालिकेत काम केलंय. अनन्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या. तेव्हा वडिलांनी तिला एक किडनी दिली होती.
अधिक वाचा –
अनन्या म्हणाली, सर्व काही संपलं. आईचा बिझनेसदेखील बंद झाला. ती आता रुग्णालयात आहे.
तिच्याकडे उपचारासाठी अधिक पैसे नाहीत. आता आमच्यापुढे खूप साऱ्या अडचणी, संकटे आहेत.
अनन्याने एका वृत्तपत्राशी संवाद साधला. ती म्हणाली, क्राईम पेट्रोल या मालिकेचे काम करत सुरू होते.
अचानक किडनीमध्ये बिघाड झाला. मला फ्रेश किडनी ट्रान्सप्लांटची आवश्यकता आहे. अनन्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
अनन्या एका रुग्णालयातील बेडवर दिसते.
अनन्या सोनी – क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्री म्हणते – मला ऊर्जाहीन असल्याचं जाणवत आहे. माझ्या किडन्या नीट काम करत नाहीत. याचमुळे मी रुग्णालयात दाखल झाले आहे.
मी आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. माझी स्थिती चांगली असल्यास माझ्या किडन्या रिवाईव्ह करू शकतात. पण, आता परिस्थिती ठिक नाही.
अधिक वाचा –
मागितली आर्थिक मदद
अनन्या सोनी क्राईम पेट्रोल मधून लोकप्रिय झाली. तिने व्हिडिओ कॅप्शनमध्ये बँक अकाऊंटचे डिटेल्स शेअर केले. फॅन्स, फॉलोअर्सकडे आर्थिक मदत मागितली आहे. तिने व्हिडिओ पोस्ट करत आपल्या व्यथा मांडल्या आहेत.
हे ही वाचलतं का?
पाहा व्हिडिओ – नेमका काय आहे कर्मयोगाचा सिध्दांत