पुढारी ऑनलाईन डेस्क : Yamaha या टू व्हिलर कंपनीकडून प्रत्येक वर्षी नवनवीन फिचर्ससह ग्राहकांच्या पसंतीची वाहने बाजारात आणली जातात. दरम्यान, आता यामाहाकडून FZ चे नवीन अपडेटेड मॉडेल बाजारात आणण्यात आले आहे. यंदाच्या वर्षात YAMAHA FZS-FI असे मॉडेल बाजारात आणल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या वाहनामध्ये जबरदस्त फिचर्स आणि आरामदायी प्रवास होण्यासाठी सीट व्यवस्था करण्यात आली आहे.
Yamaha ने नवीन अपडेट्ससह FZS-Fi मोटरसायकल लॉन्च केली आहे. कंपनीने त्याची एक्स-शोरूम किंमत १ लाख १५ पंधरा हजार ९०० रुपये निश्चित केली आहे. FZ मध्ये Dlx प्रकार हे नवीन फिचर्स बाजारात आणले आहे.
या मोटारसायकलची किंमत १ लाख १८ हजार ९०० रुपये इतकी असणार आहे.
यावर्षी यामाहाकडून काढण्यात आलेल्या बाइकला पुर्वीच्या पेक्षा या ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अधिक सुसज्ज देण्यात आली आहे. दरम्यान या ब्लूटूथचा दरही १००० रुपये जास्त महाग असणार आहे. नवीन बाईकमध्ये फक्त एलईडी टेल-लॅम्प देण्यात आला आहे. ही बाईक आता फक्त दोन रंगात उपलब्ध असणार आहे. मॅट ब्लू आणि मॅट रेड या रंगांचा समावेश करण्यात आला आहे.
बाईकमध्ये कोणतेही टेक्निकल बदल करण्यात आलेले नाहीत. सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड १४९cc इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ७ हजार २५० rpm असेल तर १२.४ hp आणि ५५०० rpm वर १३.३ Nm टॉर्क जनरेट करते.