Latest

Wrester Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाविरुद्ध बृजभूषण यांची ‘भावनिक’ खेळी; व्हिडिओ व्हायरल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवणार्‍या भारतीय मल्लांनी अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत त्यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली अनेक कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर निदर्शने सुरू केली आहेत. या आंदोलनाविरुद्ध बृजभूषण शरण सिंह यांनी आता भावनिक खेळी आली आहे.  गुरुवारी (दि.२७) एक व्हिडिओ शेअर करत म्हंटलं आहे, ज्या दिवशी हे सर्व असह्य होईल त्या दिवशी मृत्यूने मला मिठीत घ्यावे". (Wrester Protest)

Wrester Protest : बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गंभीर आरोप

जंतर-मंतरवर कुस्‍तीपटूंनी १८ जानेवारी २०२३ रोजी आंदोलन केले होते. यावेळी त्‍यांनी बृजभूषण शरण सिंह आणि महासंघावर लैंगिक शोषण, मानसिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आर्थिक गैरव्यवहार यासह विविध आरोप केले होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने हस्तक्षेप केला आणि कुस्तीपटूंच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी आणि WFI च्या दैनंदिन कामकाजाचा ताबा घेण्यासाठी एक तपास समिती स्थापन केली होती. पर्यवेक्षण समिती स्थापन करण्याआधी सरकारने त्यांच्याशी सल्लामसलत केली नाही, असाही दावा त्‍यांनी केला होता. रविवारपासून (दि. २३ एप्रिल) ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि दुहेरी विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा बृजभूषण यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.

बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी (दि.२७) एक व्हिडिओ शेअर करत म्हंटलं आहे, ज्या दिवशी हे सर्व असह्य वाटेल त्या दिवशी मृत्यूने मला मिठीत घ्यावे"वाचा बृजभूषण शरण सिंह यांनी व्हिडिओमध्ये काय म्हंटलं आहे ते.

असे जीवन जगणार नाही : बृजभूषण शरण सिंह 

भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी (दि.२७) वैयक्तिकरित्या एक व्हिडिओ शेअर करत म्हंटल आहे की," मित्रांनो, ज्या दिवशी मी काय मिळवले किंवा काय गमावले याचे आत्मपरीक्षण करेन आणि मला वाटेल की माझ्यात लढण्याची ताकद नाही; ज्या दिवशी मला असह्य वाटेल, मी असे जीवन जगणार नाही म्हणून मी मृत्यूची इच्छा करेन, असे जीवन जगण्यापेक्षा मृत्यूने मला आपल्या मिठीत घ्यावे, अशी माझी इच्छा आहे". हा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

पंतप्रधान मोदींनी आमची 'मन की बात' ऐकावी

गेल्या चार दिवसांपासून, कुस्तीपटूंनी राष्ट्रीय राजधानीतील जंतरमंतरजवळ बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. ते आंदोलन ठिकाणीच झोपत आहेत आणि सराव करत आहेत. बुधवारी (दि.२५) कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षाविरोधात जंतर-मंतरवर कँडल मार्च काढला. मोर्चात विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक सहभागी होते. मीडियाशी बोलताना साक्षी मलिक म्हणाली, "आम्ही पंतप्रधान मोदींना आमची 'मन की बात' ऐकण्याची विनंती करतो. स्मृती इराणी-जी देखील आमचे ऐकत नाहीत. आम्ही या कँडल मार्चद्वारे त्यांना प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत."

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT