एसटी कर्मचारी  
Latest

महाड एसटी आगारातील कामगार पुन्हा संपावर!

अनुराधा कोरवी

महाड; पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी एसटी कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात केलेल्या घोषणेनंतर महाड एसटी आगारातील बहुसंख्य कामगारांनी दोन दिवसांपूर्वी कामावर हजर होऊन नियमित सेवा सुरू केली होती. मात्र यादरम्यान झालेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्र्वभूमीवर सर्व कामगारांनी आज सकाळपासून कामगारांची असलेली वेतनवाढ व विलीनीकरणाची मागणी पूर्णपणे मंजूर होईपर्यंत पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. महाड एसटी आगारातील गाड्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र प्रत्यक्ष भेटीदरम्यान पाहावयास मिळाले.

या संदर्भात संपावर असलेल्या कामगार व कर्मचाऱ्याची विचारणा केली असता त्यांनी शासनामार्फत वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्षात एक दिवसाच्या रजेसाठी आठ दिवसांचा दंड वसूल केल्याचे सांगून विलीनीकरणाचा तसेच अंतरिम वाढ अजूनही प्रत्यक्षात मिळाली नसल्याचे कारण सांगितले.IND vs NZ Test : सोमरविले-लॅथम जोडी फोडण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान

गेल्या तीन आठवड्यापासून राज्यभरात संपावर असलेल्या कामगारांपैकी बेचाळीस जणांनी आत्महत्या केली असून पंचवीस पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी विष प्राशन केल्याची माहिती देऊन या सर्व घटनांच्या पार्श्र्वभूमीवर आम्ही संपावर नसून आमचा दुखवटा कार्यकाळ सुरु असल्याचे स्पष्टीकरण दिले.

दोन दिवसांपूर्वी कामावर हजर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाडसह रत्नागिरी- कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचार्‍यानी नियमित काम सुरू केले होते. मात्र आजपासून या दोन्ही विभागासह रायगडमधील केवळ महाडमध्ये सुरू असलेले काम आज सकाळपासून बंद करण्यात आल्याने सकाळी पनवेल, पुणे व बोरीवली येथे गेलेले चालक- वाहक संध्याकाळी सेवा समाप्त झाल्यावर ती संपामध्ये सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला.

या संदर्भात आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी महाड आगारामधील कर्मचारी आज सकाळपासून पुन्हा संपावर गेल्याचे मान्य केले असून याची माहिती आपण वरिष्ठ कार्यालयास कळविल्याचे सांगितले.

महाड एसटी आगारासमोरील नव्याने निर्माण होणाऱ्या इमारतीमध्ये संबंधित कर्मचारी चालक व वाहक यांनी ठिय्या मांडला असल्याचेही यावेळी पाहावयास मिळाले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT