नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण देताना सर्वपक्षीय बैठकीत ओबीसींचे आरक्षण कुठेही कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारतर्फे निश्चय करण्यात आला आहे. ओबीसी महासंघाच्या मोर्चाला भाजपाचा सुरुवातीपासून पाठिंबा होता, त्यामुळे त्यात कुणी घुसले आणि फुट पाडली असा आरोप करणे चुकीचे आहे. त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.
नाना पटोले आणि कॉंग्रेसला जनतेला समजून सांगता येत नाही, त्यामुळे ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. ओबीसी आंदोलनात मोर्चा झाल्यावर आंदोलन स्थगितीवरून आता राजकारण सुरू झाल्याचे उघड झाले आहे. भाजपने हे आंदोलन संपविले असा आरोप होत असताना बावनकुळे यांनी उत्तर दिले. बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना केली.
बावनकुळे म्हणाले, आजचा दिवस एतिहासिक असून नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले. १४० कोटी भारतीयांसाठी नवे संसद भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून नवा इतिहास पंतप्रधान मोदी यांनी घडविला. हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना ३३% आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.