Women’s Reservation Bill 
Latest

Women’s Reservation Bill : “…मग अधिवेशन कशाला घेतलं?” : सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. संसदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलत असताना सत्ताधारी सदस्‍यांनी गोंधळ सुरु केला. यावरून सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या. "अधिवेशनात बोलू देत नाहीत, आमचं एकत नाहीत; मग विशेष अधिवेशन घेतलचं कशाला?",  असा सवाल त्यांनी आज (दि. 20) केंद्र सरकारला केला. (Women's Reservation Bill )

संबधित बातम्या :

Women's Reservation Bill : असा पक्ष महिलांना समान वागणून कसा दोणार? 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सभागृहात बोलत असताना सत्ताधारी गटातून गोंधळ सुरु झाला. यावरुन त्या आक्रमक झाल्या.  "सभागृहात बोलू देत नाहीत, आमचं एकत नाहीत मग अधिवेशन घेतलचं कशाला?. समाजात महिला आणि पुरुष समान आहेत. भाजपचेच मंत्री माझ्यासारख्या निवडून आलेल्या महिला खासदारांविरुद्ध अभद्र टिप्पणी करत असताना महिलांच्या कल्याणासाठी ते कसे समर्थन करू शकतात, असे सवाल केंद्राला केला. याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाला पाठींबाही दिला.

दुष्काळ, महागाई, बेरोजगारी आणि महाराष्ट्रातील धनगर, मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांच्या आरक्षणाच्या मागणीच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करावी अशीही मागणी केली, पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या, "या विधेयकानुसार, जनगणनेची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आणि सीमांकन व्यायाम आयोजित केल्यानंतरच महिला आरक्षण लागू केले जाऊ शकते. या दोन्हीच्या तारखा निश्चित नाहीत." संसद आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या कालमर्यादेबाबत स्पष्टीकरणही मागितले;

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT