No Confidence Motion  
Latest

Winter Session : ‘लिंबू-टिंबू’ची भाषा करणार्‍यांकडून प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Arun Patil

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : Winter Session : ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांड, अंधश्रद्धा आणि अनिष्ठ चालीरीतीवर हल्ला चढविला, त्याच प्रबोधनकारांचे वारसदार आता लिंबू फिरवण्याची भाषा करू लागला आहे. 'लिंबू-टिंबू'ची भाषा करणार्‍यांनी बाळासाहेबांबरोबरच आता प्रबोधनकारांच्या विचारांनाही तिलांजली दिली आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. हिर्‍यापोटी जन्मली गारगोटी अशा भाषेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला.

Winter Session : विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले. ते म्हणाले, 'वर्षा'वर मी उशिरा राहायला गेलो, तिथे काय आहे ते बघा असे मी सांगितले, तेव्हा पाटीभर लिंबू सापडले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे देखील सर्व काही करतात, असे सांगत त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली. मी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम करतो आहे.

Winter Session : त्यामुळे आम्ही रेशीमबागेत गेलो त्यात काही गैर नाही. तुमच्यासारखे काही गोविंद बागेत तर गेलो नाही ना, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांना आव्हान देताना ज्याला तुमची सगळी अंडीपिल्ली माहीत आहेत, त्याच्यावर तुम्ही आरोप करता. हिंमत असेल तर रस्यावर येऊन लढा. जे घरातून बाहेरच पडत नाहीत, त्यांनी हिंमत दाखवण्याची भाषा करणे हा केवढा मोठा विनोद आहे, अशी खिल्लीही एकनाथ शिंदे यांनी उडविली.

महापुरुषांचा सन्मान करण्याबाबत तुम्ही आम्हाला शिकविता का? असा सवाल करून छत्रपतींच्या वारसदाराकडे वंंशज असल्याचे पुरावे कोणी मागितले होते? संभाजीराजांकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र कुणी मागितले? असे सवालही केले.

Winter Session : पडेल म्हणता म्हणता सहा महिने झाले

आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार पडेल असे वारंवार सांगत आहेत. पण आम्ही सहा महिने पूर्ण केले. आता फेब्रुवारीध्ये पडेल म्हणाले आहेत. कोणती फेब्रुवारी ते वर्ष नाही सांगितले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Winter Session : शेतकरीही हेलिकॉप्टरमध्ये फिरवा!

मुख्यमंत्री म्ह्णाले की, विदर्भातील शेतकरी आता समृद्धी महामार्गाने फिरत आहे. शेतकर्‍यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरले पाहिजे, त्यासाठी तालुका स्तरावर हेलिपॅड उभारतो आहोत. या हेलिपॅडमुळे रुग्णांना एअरलिफ्टही करता येणार आहे. मुख्यमंत्री आपल्या शेतीवर हेलिकॉप्टरने जातोय असे हिणवण्यापेक्षा अडीच वर्ष बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षीस मिळवा, असे तुमच्यावर बक्षीस लागले होते, असा प्रतिटोला लगावला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT