High Security Number Plate : उद्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य | पुढारी

High Security Number Plate : उद्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एक जानेवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या प्लेट नसणार्‍या वाहनांना 5 ते 10 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. (High Security Number Plate)

एक जानेवारीपासून सुरू होणार्‍या नवीन वर्षात जीएसटी, बँकिंगसह अनेक नियमांत बदल होत आहेत. त्यातला प्रमुख म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी न झाल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोडेड स्टीकर्स अनिवार्य करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणार्‍यांना 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी दर निश्चित करण्यात आले असून दुचाकी वाहनांना 365 तर चारचाकी वाहनांना 600 ते 1100 रुपये खर्च येणार आहे. (High Security Number Plate)

नवीन वर्षात लागू होणारे नवीन नियम पुढीलप्रमाणे… (High Security Number Plate)

  • जीएसटी परिषदेच्या गेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू होणार.
  • सीएनजी, पीएनजीचे नवे दर लागू होणार, जर बदल झाले तर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीही एक जानेवारीपासून लागू होतील.
  • केंद्र, राज्य सरकारे तसेच केंद्रीय स्वायत्त संस्थांच्या सर्व कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेतील काही भाग काढण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी नियुक्त अधिकार्‍याकडे अर्ज करावा लागणार आहे. सोबत पेन्शन काढण्याची कारणे सबळ कागदपत्रांसह नमूद करणे आवश्यक आहे.
  • बँकांचे लॉकर कराराबाबतचे नियम सौम्य होणार आहेत. ग्राहकांना त्रासदायक ठरतील असे नियम वगळून ते अधिक सुलभ केले जाणार आहेत. जुन्या ग्राहकांना लॉकरबाबतच्या कराराचे नूतनीकरण करावे लागणार आहे.
  • क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल झाले आहेत. या कार्डांच्या रिवॉर्ड पॉईंट योजनेत हे बदल असणार आहेत. आता मिळालेले रिवॉर्ड पॉईंट 31 डिसेंबरपर्यंत वापरावे लागणार आहेत.
  • टाटा, मारुती सुझुकी, ऑडी, मर्सिडिझ बेंझ यांच्यासह अनेक वाहन कंपन्यांनी कारच्या किमती वाढवल्या असून त्या एक तारखेपासून लागू होणार आहेत.

अधिक वाचा :

Back to top button