Aeroplane Landing : महामार्गावर लढाऊ विमाने उतरवण्याची चाचणी यशस्वी | पुढारी

Aeroplane Landing : महामार्गावर लढाऊ विमाने उतरवण्याची चाचणी यशस्वी

हैदराबाद, वृत्तसंस्था : Aeroplane Landing : चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विमाने उतरवण्याची सुविधा करण्यात आली असून आंध्र प्रदेशात अशाच एका रस्त्यावरील धावपट्टीची चाचणी हवाई दलाच्या सुखोई, तेजस आणि एका मालवाहू विमानाने घेतली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा हवाई दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.

Aeroplane Landing : देशातील काही महामार्गांवर आपत्कालीन स्थितीत विमाने उतरवता येणार आहेत. त्यासाठी काही महामार्गांवर रस्त्यांची रचना धावपट्टीसारखी करण्यात आली आहे. चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर आंध्र प्रदेशात बपताला जिल्ह्यात एक चाचणी घेण्यात आली. हवाई दलाची दोन सुखोई व दोन तेजस ही लढाऊ विमाने तसेच एएन 32 या मालवाहू विमानांचा या चाचणीत समावेश होता.

Aeroplane Landing : ही विमाने आकाशातून झेपावत खाली आली व रस्त्यापासून अवघ्या 5 मीटर उंचीवर येऊन पुन्हा झेपावत निघून गेली. हवाई दल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही चाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. मात्र या ठिकाणी अद्याप काही किरकोळ कामे होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावरच विमाने प्रत्यक्ष उतरवता येणार आहेत.

हे ही वाचा :

थर्टी फर्स्ट : साऊंड सिस्टीमला रात्री 12 पर्यंत परवानगी

७० हजार कोटींचे प्रकल्प येणार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घोषणा

Back to top button