Latest

Winter : जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी

Arun Patil

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशभरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडी पडत आहे. विशेषतः उत्तर भारतात कडक्याची थंडी पडत आहे. काश्मिरातील अनंतनाग सेक्टरमध्ये मंगळवारी किमान तापमान 1.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. श्रीनगरमध्ये किमान तापमान 3.9 अंश सेल्सिअस, तर कोकरनागमध्ये किमान 2.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. (Winter)

पर्वतराजीतील हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये 1 डिसेंबरपर्यंत मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही काळात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दिल्लीतही पाऊस झाल्याने किमान तामपान 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. येत्या काही दिवसांत तापमानात 4 ते 8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही पाऊस होत असून अनेक शहरांत गारपीट झाली आहे. दिल्लीतील खराब वातावरणामुळे 16 फ्लाईटस् अन्य शहरांकडे वळवण्यात आल्या. रविवारी पाऊस झाल्याने वीज पडून गुजरातमध्ये 24 आणि मध्य प्रदेशात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. (Winter)

दिल्लीत प्रदूषण आणखी गंभीर होण्याची शक्यता

दिल्लीत रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे प्रदूषणामध्ये काहीशी घट झाली आहे; मात्र येत्या काळात हवेचा वेग मंदावणे आणि लग्नसराईमुळे वाहनांची वर्दळ वाढल्याने पुन्हा प्रदूषण 'जैसे थे' राहण्याची चिंता दिल्ली सरकारला भेडसावत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पाऊस झाला असला, तरी दिल्लीच्या बहुतांश भागांत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 400 पेक्षा अधिक होता. एवढेच नव्हे, तर पुढील सहा दिवस दिल्लीतील प्रदूषण आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT