पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal- Katrina Kaif Divorce) एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात कधीही कसूर करत नाहीत. या क्युट जोडीने प्रेमाचा एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. त्या दोघांचा संसार चांगला चालला आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांच्या प्रेमात आकंड बुडालेले आहेत. हे सेलिब्रिटी जोडपे वेगळे होणार का ? या प्रश्नाचे स्वत: विकी कौशलने उत्तर दिले आहे.
'जरा हटके जरा बचके' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगच्या वेळी एका पत्रकाराने विकीला (वVicky Kaushal- Katrina Kaif Divorce) प्रश्न केला की, जर तुला चांगली अभिनेत्री मिळाली, तर तू पत्नी कतरिना कैफला घटस्फोट देणार का ? सुरुवातीला या प्रश्नावर विकी अवाक् झाला. विकी फक्त हसला आणि त्यानंतर तो प्रश्नावर विनोद करू लागला. "सर, शाम को घर भी जाना है! ऐसे ऐसे तडे मेडी सावल पुछ कर रहे हो, बचा हू अभी बडा तो होने दो. कैसे जबाब दो इसका मै! इतना खतरनाक सवाल पुचा है, असे विकीने गंमतीने म्हणत उत्तर दिले की, कॅटशी आयुष्यभर एकत्र राहीन, "जन्मो जन्मो तक"
दरम्यान, विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील फोर्ट बरवारा येथील सिक्स सेन्सेस रिसॉर्ट येथे कतरिना कैफसोबत लग्न केले आहे. हे क्युट जोडपे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात थकत नाहीत.
विकी सध्या सारा अली खानसोबत आगामी रोम-कॉम जरा हटके जरा बचकेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच इतरही अनेक प्रकल्प त्याच्याकडे आहेत. आतापर्यंत, विकीने तृप्ती डिमरी आणि विजय कृष्ण आचार्य यांच्या कौटुंबिक चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली', आनंद तिवारीच्या 'मेरे मेहबूब मेरे सनम'चे चित्रीकरण पूर्ण केले आहे. डंकी आणि सॅम बहादूर नावाच्या बायोपिकमध्येही तो दिसणार आहे.
हेही वाचा