पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. या स्पर्धेनंतर विराटची दमदार फलंदाजी द. आफ्रिकेविरूद्ध पुन्हा पहायला मिळेल असे क्रिकेट चाहत्यांना वाटत होते. पण, विराट बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पांढऱ्या चेंडूची मालिका खेळणार नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Virat Kohli)
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, विराट कोहलीने बीसीसीआयला व्हाईट बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याचा संदेश दिला आहे. यामुळे तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये निवडीसाठी उपलब्ध असेल. भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे. जिथे टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटची (टी-20, एकदिवसीय, कसोटी) मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. त्यानंतर 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर 26 डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Virat Kohli)
बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना विराट म्हणाला की, मला व्हाईट बॉल क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे. योग्य वेळी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पुनरागमन करीन असे ही तो म्हणाला. सध्या विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.
भारताने आयोजित केलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये, विराट कोहलीने अनेक विक्रम मोडले आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने 11 सामन्यांच्या 11 डावात 95.62 च्या सरासरीने 765 धावा केल्या होत्या. या काळात त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. 765 धावांसह कोहलीने एकदिवसीय विश्वचषकाच्या कोणत्याही एका आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
हेही वाचा :