Latest

Ajit pawar Shirdi : महामानवांच्याबाबत बेताल वक्तव्य सहन करणार नाही; अजित पवार

अमृता चौगुले

अहमदनगर : महामानवांच्याबाबत बेताल वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता दिला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त अजित पवार बोलत होते. शिर्डी येथील काकडी या गावी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. राम शिंदे हे उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ आई, शाहु महाराज, क्रांती ज्योती महात्मा ज्योतीराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत. यांचा आदर केलाच पाहिजे. त्यांबाबत कोण बेताल वक्तव्य वक्तव्य करू नये, याची खबरदारी आमच्याकडून घेतली जात आहे, असं अजित पवार बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून चांगले काम होत आहे, असं म्हणत या उपक्रमाचे कौतुक केले

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, दिव्यांग यांना सहजासहजी लाभ मिळतोय. त्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होतेय. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आपलं राज्य पहिल्या क्रमाकांवर यावे, यासाठी आम्ही एकजुटीने लोकांच्या कामासाठी झटणार आहोत. यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी राज्यातील नागरिकांना केले. ज्यांनी शासन आपल्या दारी या योजनेमध्ये योगदान दिले आहे त्यां सर्वांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या समाजकारणात, सत्ताकारणात कोणत्याही भूमिकेत असलो तरी राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा असेल. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी यापुढेही काम करत राहीन असा शब्द मी राज्यातील जनतेला देतो,असे अजित पवार बोलताना म्हणाले.

शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना घरबसल्या लाभ मिळतोय याचा आनंद आहे. या पुढेही हे काम सुरुच राहील. योजनांची माहिती घेणे, कागदपत्र जमा करणं, या योजनेमुळे लोकांना सरकारी कार्यालयात जावं लागणार नाही. या योजनेच्या माध्यमातून सरकार थेट गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT