पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासाठी डावलण्यात आलं? या मुदद्यावरून गेले काही दिवस देशभरात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत माध्यमांशी बोलत असताना आमदार संजय राऊत म्हणाले, "नवीन संसद उभारली याचा आम्हाला आनंद आहे. मात्र जिथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासाठी बोलावलं नाही ते आम्हाला काय बोलावणार" असं म्हणतं त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. (Sanjay Raut)
देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या 28 तारखेला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते का नाही असे म्हणत तृणमूल काँग्रेस, राजद, संयुक्त जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (युबीटी) या पक्षांसह १९ हून अधिक विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यावर आज (दि.२५) खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षातील नाहीत तर देशभक्त आहोत."
राऊत पुढे म्हणाले की, "नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं, नवीन संसद उभारले याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे. तुम्ही राष्ट्रपतींचे अधिकार डावलू नका. रविवारच्या (दि.२८) कार्यक्रमाला राष्ट्रपतींना बोलवा. तसेच यावेळी त्यांनी मोदींच्या विदेश दौऱ्यावर देखील टीका केली. राऊत म्हणाले की, "परदेशात जाऊन लोकशाहीवर बोलतात, देशातील लोकशाही मेली आणि जगात जाऊन कसला डंका मारत आहेत. मुर्मूंना आमंत्रण नाही आणि हे लोकशाहीवर बोलत आहेत.
हेही वाचा