शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर कारवाई करा : फडणवीसांचे आदेश | पुढारी

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर कारवाई करा : फडणवीसांचे आदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज (दि. २४) झालेल्या जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यातील आढावा बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश देत संताप व्यक्त केला.

या बैठकीत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने फडणवीस यांनी आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.

जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे अशी माहीती फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामुळे आता गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गती प्राप्त होणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणार असे आश्वासन देखील त्यांनी दिले. शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्यासाठी सोलर योजना आणण्यात येत आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button