लखनौ : पुढारी ऑनलाईन
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत
त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना 'युपी टाईप' असे विधान केले होते. या विधानाचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्टिवरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.
प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे की, "तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्पात उत्तर प्रदेशसाठी कोणतीही तरतूद केली नाही. हरकत नाही;पण उत्तर प्रदेशमधील लोकांचा अपमान करण्याची काय गरज होती? उत्तर प्रदेशमधील लोकांना 'युपी टाईप' असल्याचा अभिमान आहे. आम्हाला आमची भाषा, पोटभाषा, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे".
मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावर प्रतिक्रिया देताना, राहुल गांधी यांनी 'झीरो सम बजेट' अशी टीका केली होती. राहुल गांधींच्या टीकेवर बोलताना सीतारामन म्हणाल्या, राहुल गांधी यांना अर्थसंकल्पच समजला नाही, असे युपी टाईप उत्तर केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिले आहे. आम्ही अर्थसंकल्पात सर्व घटकांचा विचार केला आहे. मला वाटल पंकज चौधरी यांनी राहुल गांधी यांना 'युपी टाईप' उत्तर दिले असून उत्तर प्रदेशमधून पलायन केलेल्या खासदारासाठी ते पुरेसे आहे, असेही सीतारामन म्हणाल्या होत्या.
उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे १० फ्रेबुवारी रोजी होईल.
हेही वाचलं का?