Latest

पालेभाज्या का खाव्यात आणि त्यांचे पोषणमूल्य टिकवण्यासाठी काय करावे?

अनुराधा कोरवी

रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करण्यामुळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो आणि उत्तम आरोग्याला चालना मिळते.

हिरव्या भाज्यांमध्ये काही बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वेदेखील असतात. त्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोतदेखील आहेत.

भारतामध्ये पाच वर्षाखालील अंदाजे 30,000 बालकं अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे अंध बनतात. हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीन शरीरामध्ये प्रक्रियेनंतर परिवर्तित होऊन 'अ' जीवनसत्त्व बनते. त्यातून हे अंधत्व टाळता येते.

संबंधित बतम्या 

आपल्याकडे सामान्यतः असं मानलं जातं की हिरव्या भाज्यांमुळं लहान मुलांना हगवण होते. त्यामुळं अनेक आया आपल्या मुलांना या पोषक अन्नापासून दूर ठेवतात. अनेक प्रकारचे जिवाणू/जंतू/किडे आणि इतर विचित्र पदार्थ हिरव्या भाज्यांना पाणी आणि मातीतून दूषित करतात. त्या जर नीट धुवून घेतल्या नाहीत तर खाल्ल्यानंतर हगवण लागू शकते. अशा प्रकारचे प्रदूषक काढून टाकण्यासाठी सर्व पालेभाज्या वाहत्या पाण्यात चांगल्या धुऊन घ्याव्यात आणि हगवण होणे टाळावे.

लहान बाळांना भाज्या ह्या शिजवून, कुस्करून आणि गाळून घेऊन, जेणेकरून त्यातला तंतुमय भाग निघून जाईल, मगच खायला द्याव्यात.

हिरव्या भाज्यांचे पोषणमूल्य टिकवून ठेवण्यासाठी, जादा किंवा अति प्रमाणात शिजवणे टाळावे. पालेभाज्या शिजवल्यानंतर या भाज्यांपासून मिळणारे पाणी फेकून देऊ नये.

हिरव्या भाज्या ज्या भांड्यात शिजवल्या जातील त्यावर झाकण असेल याची काळजी घ्यावी.

पालेभाज्यांची पाने उन्हात सुकवू नयेत अन्यथा त्यातील कॅरोटीन नष्ट होईल. तसेच हिरव्या भाज्या तेलावर परतू नयेत.

दरवेळी या भाज्या बाजारातून विकतच आणल्या पाहिजेत असं नाही. परसबाग, छतावरील बाग, शाळेतील बाग इत्यादी ठिकाणं ही हिरव्या पालेभाज्या उगवण्यासाठी आदर्श आहेत. शेवगा, अगाथी इत्यादी झाडांच्या हिरव्या पानांचा उपयोग हा ते झाड परसात लावलेले असेल तर फारसा प्रयत्न न करता नियमितपणे होऊ शकतो.

जेव्हा बाजारातून या भाज्या विकत घेणार असाल तेव्हा त्यांचे पोषणमूल्य हे त्यांच्या किंमतीवर ठरवू नका. बहुतेक लोक तसं करतात आणि त्या दुय्यम महत्त्वाच्या असल्याचं समजून त्यांना टाळतात. हिरव्या भाज्या स्वस्त असल्या तरी, त्या अत्यंत पोषक असतात आणि सर्वांनाच आवश्यक असतात हे समजून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT