पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक ॲटली कुमार याचे अनेक तामिळ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तामिळ चित्रपटसृष्टीत सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आहेत. दरम्यान, आता ताे शाहरुखच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहेत. ॲटली याने अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. जवानच्या निमित्ताने त्याला शाहरुख खान सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान, सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित करणाऱ्या ॲटलीला त्याच्या रंगामुळे अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले आहे.
शाहरुख खानचा जवान चित्रपट आज (दि.७) प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वस्तरातून ॲटली कुमारच्या कामाची प्रशंसा हाेत आहे. या चित्रपटामुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मागील दह वर्षात त्याने केवळ ५ चित्रपट दिग्दर्शितीत केले आहेत. मात्र त्यांचे सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. ॲटली कुमार याची गणना तामिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांमध्ये केली जाते. विशेषतः ॲक्शन चित्रपट बनवण्यासाठी ताे ओळखला जाताे. ॲटलीने साऊथ सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केले आहे.
ॲटली कुमार तीन वर्षांपूर्वी प्रसिद्धीझोतात आला हाेता. कृष्णवर्णीय असल्यामुळे त्याला ट्रोल करण्यात येत होते. वास्तविक, ॲटली २०१९ मध्ये शाहरुख खानसोबत आयपीएलमधील सामना पाहण्यासाठी गेला होता. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता.