Latest

Video : थरारक! गायिका अंगावर खेळवत होती साप, पण तिला तो असा डसतो की….

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्राण्यांसोबत काम करणे सोपे नाही आणि कधीही ते धोक्याचे ठरू शकते. 'बिच डोन्ट बी मॅड' ('Bitch Don't Be Mad) गाण्याची २१ वर्षीय अमेरिकेची गायिका माएता (Maeta) हिला असाच एक भयानक अनुभव आला. एक म्युझिक व्हिडिओचे (music video) शूटिंग सुरु असताना तिच्या अंगावर साप सोडण्यात आले होते. पण या दरम्यान जे घडले ते दृश्य अंगावर काटा आणणारे होते.

माएता हिने इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शूटिंग सुरु असताना तिला साप चावतो. या व्हिडिओत माएता ब्लॅक लेस असलेल्या बॉडीसूटमध्ये दिसत आहे. ती जमिनीवर झोपली असून तिच्या अंगावर काळ्या रंगाचा साप सोडण्यात आला होता. त्यानंतर काही क्षणात तो तिच्या हनुवटीचा चावा घेतो. त्यानंतर ती सापाला अंगावरुन दूर करते.

तिने हा व्हिडिओ (music video) स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाख ९० हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 'तुम्हा सर्वांसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी मी काय प्रयत्न करतो" (what I go through to make videos for y'all) अशी कॅप्शन तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

साप चावल्याची घटना सोडल्यास Maeta साठी २०२१ वर्ष चांगले गेले आहे. पीपल डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, माएताला वर्षाच्या सुरुवातीला Jay-Roc Z's Nation साठी संधी मिळाली होती. 'Teen Scene,' 'Toxic,' आणि 'Habits' आदी गाण्यांचा समावेश असलेला तिचा पहिला अल्बम रिलीज झाला होता.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT