Latest

 WhatsApp New Feature | एका हाताने वापरा व्हॉट्सॲप; येत आहे नवीन फिचर

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सॲप. त्याचबरोबर दिवसेंदिवस व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांची संख्याही वाढत असतानाही दिसत आहे. आपल्या युजर्संना व्हॉट्सॲप वापरण्यात सुलभता येण्यासाठी नवनवीन हटके आणि धमाकेदार फिचर देत असते. आता आणखी एक नवे फिचर व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी आणलं आहे. या फिचरचे नाव आहे बॉटम टॅब इंटरफेस. ( WhatsApp New Feature )

 WhatsApp New Feature मध्ये काय आहे खास?

व्हॉट्सॲप युजर्स व्हॉट्सॲप फिचरचा वापर करुन संबंधित व्यक्तींशी संवाद करत असतो. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून युजर त्यांच्या भावना अथवा आपल्या काही घडामोडी तसेच इतर माहिती इतर युजर्सशी शेअर करत असतो. व्हॉट्सॲप कंपनी अनेक नवीन फीचर्सवर काम करत असून लवकरच एक नवीन फीचर आपल्या युजर्ससाठी आणू शकते. त्याचे नाव बॉटम टॅब इंटरफेस आहे. या फिचरमुळे व्हॉट्सॲप  वापरणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यूजर्स एका हाताने ॲप कोणत्याही अडचणीशिवाय  वापरू शकतील.

व्हॉट्सॲपने अलीकडेच ॲपच्या बीटा आवृत्तीमध्ये नवीन रंग आणि उच्चारांसह पुन्हा डिझाइन केलेल्या इंटरफेसची चाचणी सुरू केली आहे. हे iOS आणि Android दोन्हीमध्ये उपलब्ध असणार आहे. हे अपडेट गुगल प्ले स्टोअर वरून WhatsApp Android 2.23.20.76 अपडेट करून उपलब्ध होईल. त्यात एक नवीन बॉटम-टॅब इंटरफेस उपलब्ध असेल. डाव्या बाजूला कम्युनिटी आयकॉन असलेल्या छोट्या टॅबमध्ये चॅट, कॉल, स्टेटस टॅब मिळेल. व्हॉट्सॲपवर शेवटी चॅट, अपडेट्स, कम्युनिटी आणि कॉल टॅब आहेत. यासोबतच असे आयकॉन देखील दिले जातील जे आधी उपलब्ध नव्हते पण आता ते स्क्रीनच्या वरती आहेत. या बदलामुळे एक चांगली गोष्ट म्हणजे नवीन नेव्हिगेशन प्रणालीसह ॲप एका हाताने वापरणे सोपे होईल.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT