नवी दिल्ली ः आपल्या यूजर्ससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सातत्याने नवे नवे फीचर्स आणत असतात. व्हॉटस्अॅपवर लवकरच 'फॉरवर्ड' मेसेजमध्येही नवे वैशिष्ट दिसणार आहे. त्याची पहिली झलक बीटा अपडेटमध्ये दिसली आहे. सध्या हे फीचर विकासाच्या वाट्यावर आहे, जे यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो. एका रिपोर्टनुसार, फोटो आणि व्हिडीओ फॉरवर्ड करताना कॅप्शन (WhatsApp Caption) (फोटो ओळी) लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर उपलब्ध होणार आहे.
'वेबटेन्फो'च्या ताज्या अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की व्हॉटस्अॅप लवकरच आणखी एक उपयुक्त मेसेजिंग फीचर घेऊन येत आहे. व्हॉटस्अॅप बीटा फॉर 2.22.23.4 अपडेटसाठी व्हॉटस्अॅप बीटा फीचरची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. रिपोर्टनुसार, आता यूजर्स व्हॉटस्अॅपवर फोटो, व्हिडीओ, जीआयएफ आणि डॉक्युमेंट शेअर करताना कॅप्शन लिहू शकतील. रिपोर्टमध्ये या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये नवीन इंटरफेस दिसला आहे. नवीन अपडेटनंतर, जेव्हा यूजर्स मीडिया फाईल शेअर करतात, तेव्हा त्यांना कॅप्शन लिहिण्यासाठी एक कॉलम मिळेल.
यामध्ये तो फोटो आणि व्हिडीओशी संबंधित कोणतेही कॅप्शन किंवा संदेश पाठवू शकतो. याशिवाय, तुम्ही कॅप्शन न लिहिता मेसेज फॉरवर्ड करू शकता. सध्या हे फीचर विकासाच्या वाट्यावर आहे, जे यूजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो.व्हॉटस्अॅपवर अनेक नवीन फीचर्सची बर्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. यात पोल, अवतार, एडिट, व्हॉईस स्टेटस अपडेट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. अवतार फीचर अंतर्गत यूजर्स त्यांचा अवतार तयार करू शकतात आणि मित्रांना केवळ स्टिकर्सच पाठवू शकतात असे नव्हे तर प्रोफाईल फोटोवर त्यांचा अवतार देखील अपलोड करू शकतात.
हेही वाचलंत का?