पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्र नसता तर पृथ्वीचे काय झाले असते याचा विचार केला असता काहीच झालं नसतं असं आपल्याला वाटेल. कारण सर्वच ग्रहांना काही चंद्र नाहीत. बुध आणि शुक्र यांना चंद्र नाहीत. मंगळाभोवती काही छोटे मृत्तिकाखंड घिरट्या घालतात. पण त्यांना चंद्र म्हणता येणार नाही. तेव्हा पृथ्वीलाही चंद्र नसता तर काय बिघडलं असतं ? बरंच काही. कारण चंद्र नसता तर पृथ्वीचंही आजचं स्वरूप राहिलं नसतं.
पहा चंद्र नसता तर काय झालं असतं
- चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी हळूवार फिरते. चंद्र नसता तर ती गर्रगर्र फिरली असती आणि दिवस फक्त 6 तासांचा राहिला असता.
- चंद्र नसता तर चंद्रग्रहण दिसले नसते, की सूर्यग्रहणही दिसले नसते.
- जेव्हा पृथ्वीवर चंद्रग्रहण होते, तेव्हा चंद्रावर सूर्यग्रहण होते.
- पृथ्वीवरून सूर्य आणि चंद्र सारख्याच आकाराचे दिसतात. कारण सूर्याच्या तुलनेत चंद्र पृथ्वीच्या 400 पट जवळ आहे.
- पृथ्वीवरून आपल्याला चंद्राचा केवळ 55 ते 60 टक्के भाग दिसतो.
- आजवर 12 अंतराळवीर चंद्रावर गेले आहेत. 1972 नंतर मानव मोहिमाच झाल्या नाहीत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.