पुढारी ऑनलाईन डेस्क : निरोगी लैंगिक जीवनासाठी शारिरीक आणि भावनात्मकदृष्ट्या सदृढ असणे गरजेचे असते. आपण जे पदार्थ खातो, ते पदार्थ तुमचे लैंगिक जीवन कसे असावे हे ठरवते.
पौष्टिक डाएट लैंगिक जीवनासाठी महत्त्वाचा असतो. कामेच्छा वाढविण्यासाठी रक्तप्रवाह आणि ह्रदयाचे आरोग्य, तुमचा फिटनेस या गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे भाज्या आणि प्रोटिनयुक्त आहार घेणे, फळे खाणे गरजेचे असते.
जी फळे कमी गोड असतात ती तुमचे लैगिक जीवन प्रभावित करणाऱ्या विकारांना लांब ठेवण्यास मदत करते. काही फळे अशी आहे की ती तुम्हाला उत्तम पोषक तत्वे देते. त्यामुळे ती खाल्लीच पाहिजेत.
समुद्रातील शिंपल्यांमधील कामोत्तेजक गुणांबाबत तुम्हाला माहिती असेलच. त्यात झिंकची मात्रा अधिक असते. ते रक्तप्रवाह सुरळीत करते आणि वाढवते. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेमध्ये झिंकचे महत्त्व असते. टेस्टोस्टेरोन स्तर स्थिर ठेवण्यास झिंक मदत करते. त्यामुळे आहारात शिंपल्यांचा वापर करा.
मटण किंवा त्यासारख्या पदार्थांमध्ये अमीनो ॲसिड असते. त्यामुळे तुमचे लैंगिक जीवन अधिक सुखी होऊ शकते. चिक आणि हाडासहीत असलेल्या मटणात हाय प्रोटिन असते. त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होते.
साल्मन माशाचे मांस ह्दयासाठी खूप उपयुक्त असते. ओमेगा ३ फॅटी ॲसिडसाठी हा महत्त्वाचा आहार आहे. सार्डिन, टुना आणि हलिबूट तुमचे शरीर आणि लैंगिक जीवन हेल्दी ठेवण्यास मदत करू शकते. ओमेगा ३ फॅटी ॲसिड तुमच्या धमन्यांमध्ये तयार होणारा कोलेस्टेरॉलचा थर साचू देत नाही. तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवते. निरोगी लैंगिक जीवनासाठी हे खूुप गरजेचे असते.
तुम्ही कुठलाही प्रोसेस केलेला पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर दाणे किंवा बिया खा. काजू आणि बदाम या दोन्हींमध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते तसेच तुमच्या आहारात अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि शेंगदाणे असले पाहिजेच.
सफरचंदात क्वेरसेटिन नावाचे अँटीऑक्सिडेंट मात्रा असलेले फळ आहे. ते खाल्याने अनेक प्रकारचे फायदे होतात. रक्तप्रवाह सुरळीत होणे, तसेच प्रोस्टेटाइटिसला विरोध करण्यात याची मदत होऊ शकते. रोज एक सफरचंद खाल्ल्यास तुमचे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते.
बीट हे अँटि ॲक्सिडेंट आणि व्हिटॅमीनची मात्रा मोठ्या प्रमाणात असलेले फळ. ते जर तुमच्या आहारात असेल तर तुमचा आहार हेल्दी होऊ शकतो. यात नायट्रेड मोठ्या प्रमाणात असते. नायट्रेड रक्तवाहिन्यांचा विस्तार करते त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे तुमचे लैंगिक जीवनात आनंद येऊ शकतो.
सफरचंदाप्रमाणे रेड वाइनमध्येही क्वेरसेटिन असते. त्यात असलेल्या अँटिऑक्सिडेंटमुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. २००९ मध्ये ७९८ महिलांवर केलेल्या अभ्यासानुसार नियमित रेड वाईन पिल्याचा खूप फायदा होतो. रेड वाइनच्या नियमित सेवनामुळे उच्च लैंगिक भावना होतात.
तुम्ही रोजच्या जीवनात थोड्या प्रमाणात लसणाच्या पाकळ्या, तुळशीची पाने घेत जा. तुळशीमुळे गंध इंद्रिये उत्तेजित होतात. तर लसणात ऍलिसीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळ रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि त्यामुळे लैंगिक जीवन सुखी होते.