नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोर, वेल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे-सातारा महामार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जागोजागी जंगी स्वागत करण्यात आले असून कापूरहोळ (ता. भोर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमदादा खुटवड युवामंचच्या शेकडो कार्यकर्त्यांनी क्रेनच्या साह्याने अजित पवार यांच्या गळ्यात मोठे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागताने भारावलेल्या पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांच्या अंगावर देखील फुलांची उधळण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कोल्हापूर येथे नियोजित सभेसाठी जात असताना कापुरव्होळ (ता. भोर) येथे विक्रमदादा खुटवड जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसभापती विक्रम खुटवड यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, वामनराव जगताप, राजेंद्र हगवणे, अशोक मोरे, माऊली कांबळे, समीर धुमाळ, पै. धनेश डिंबळे, सचिन सोंडकर, माऊली राऊत, भास्कर सपकाळ, महेंद्र भोरडे, नथुराम गायकवाड, गणेश मालुसरे, राहुल गाडे, अमीर बाठे, स्वप्नील शेलार आदी उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचे भोर तालुक्यातून रविवार ( दि. १० ) प्रथमच आगमन होत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी खेडशिवापूर टोलनाका येथे दिखील स्वागत करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ञ संचालक भालचंद्र जगताप, माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, मानसिंग धुमाळ, विक्रम खुटवड, यशवंत डाळ, संदीप नगरे, किरण राऊत, केतन चव्हाण, विठ्ठल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कापूरहोळ येथे अजित पवार यांच्यावर क्रेनच्या साह्याने केलेली फुलांची उधळण व घातलेला मोठा पुष्पहार आकर्षण ठरले. तर यावेळी स्वागताने भारावलेल्या पवार यांनी विक्रम खुटवड यांना सोबत घेत उपस्थित कार्यकर्त्यांच्या अंगावर देखील फुलांची उधळण करून त्यांचा ताफा कोल्हापूरकडे रवाना झाला.
हेही वाचा