पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न हा विषय सर्वांसासाठी विशेष असा असतो, प्रत्यक जण आपले लग्न खास करण्यासाठी काही तरी विशेष करण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच लग्नातील तोच तोच पणा टाळण्यासाठी लग्नात काहीतरी क्लुप्त्या देखील शोधून काढत असतात. आसाम मधील अशाच एका लग्नात नववधूने नवऱ्यामुला कडून भले मोठे कॉन्ट्रॅक्ट सही करुन घेतले होते. ज्यात अनेक अटी होत्या. ज्या नववधूने नवऱ्यामुलाकडून दर महिन्याला पिझ्झा खायला घालावे लागेल असे कॉन्ट्रॅक्टद्वारे कबूल करुन घेतले होते. ज्या नंतर आता पिझ्झा हट या कंपनीने या कपलला दर महिन्याला पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट या कपलसाठी आता बेस्ट गिफ्ट ठरत आहे. (Wedding Contract Best Gift)
याच वर्षी जून महिन्यात आसाममधील एका नव विवाहित जोडप्याने लग्नसमारंभात छोट्या छोट्या विधी करत असताना गंमत म्हणून एक लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट केले. ज्यामध्ये नववधू नववराकडून अनेक अटींच्या कॉन्ट्रॅक्टवर सहिकरुन घेते. ज्यामध्ये महिन्यातून एकदा शॉपिंग, बाहेर फिरण्यास जाणे, रोज व्यायामासाठी जीमला जाणे अशा अनेक अटी होत्या. त्यामध्ये अजून एक मजेशीर महिन्यातून एकदा पिझ्झा डेटवर जाण्याची अट होती. हे लग्नाचे मजेशीर कॉन्ट्रॅक्टला सर्वांनीच खूप पसंती दिली. या विशेष लग्नाचे व त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची चर्चा देखील झाली. विशेष म्हणजे अनेक माध्यमांमध्ये या अनोख्या मॅरेज कॉन्ट्रॅक्टच्या बातम्या देखील आल्या होत्या. (Wedding Contract Best Gift)
मजे मजेत केले गेलेलं हे कॉन्ट्रॅक्ट आता या जोडप्यासाठी बेस्ट गिफ्ट ठरलं आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये दर महिन्याला पिझ्झा डेटची अट होती. ही अट कायमस्वरुपी पूर्ण केली जाणार आहे. करवा चौथच्या निमित्ताने पिझ्झा हट या कंपनीने या जोडप्याला दर महिन्याला पिझ्झा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Wedding Contract Best Gift)
पिझ्झा हट इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन घोषित केले की या जोडप्याला दर महिन्याला पिझ्झा दिले जाईल. यावेळी इन्स्टाग्रामवर पिझ्झा हटने म्हटले आहे, आपल्या जीवनसाथीसोबत दीर्घकाळ आणि आनंदी आयुष्यासाठी महिन्यातून एक पिझ्झा!! हाच तो करार आहे, ज्यासाठी आम्ही जगत आहोत. सर्व पिझ्झा प्रेमी जोडप्यांना करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा'. यासह त्यांनी या जोडप्याचा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. (Wedding Contract Best Gift)
अधिक वाचा :