पुढारी ऑनलाईन: गेल्या आठवड्यापासून राज्यातील अनेक जिह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. यामुळे अनेक जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हाताला आलेले पिक पावसामुळे गेल्याने शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. पुन्हा एकदा पुढचे दोन दिवस विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मेघगर्जनेसह तुरळक पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने रविवारी (दि.२६) संपूर्ण विदर्भाला तर सोमवारी (दि.२७) विदर्भातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडणार आहे. तसेच यादरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. मात्र उर्वरित राज्यात कोरडे हवामान असून, कोणत्याही प्रकारचा पावसाचा इशारा नाही, असे हवामान विभागाने म्हटले आहे.