अजित पवार  
Latest

महाराष्ट्रातील प्रकल्प पळविल्यास खपवून घेणार नाही : अजित पवार

गणेश सोनवणे

जळगाव: राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 'वेदांता' प्रकल्प सुरु करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न झाले होते. त्यांनी त्यावेळेस कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र हे तीनच राज्य कंपनीच्या विचाराधीन होते, आता गुजरातचेही नाव घेतले जात आहे. आमचा कुठल्याही राज्याला विरोध नाही, मात्र आपल्या भागात येणारा प्रकल्प कुणाच्यातरी दुर्लक्षामुळे किंवा कुणाच्या तरी विरोधासाठी दुसरीकडे पळविला जात असेल तर महाराष्ट्र ते कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार जिल्हा दौर्‍यावर दाखल झाल्यानंतर चाळीसगावात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरुन शिंदे सरकारवर टीकेची झोड उठविली. पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी चाळीसगाव बाजार समितीला भेट देऊन तेथील अशासकीय प्रशासक मंडळाचे कामकाज जाणून घेतले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेंचे संचालक प्रदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.चे माजी सदस्य शशिकांत साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे प्रशासक दिनेश पाटील, भगवान पाटील, अतुल देशमुख, चाळीसगाव विकासोचे चेअरमन प्रदीप देवराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रविण राजपुत, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.

प्रकल्प राज्याबाहेर जाता कामा नये…
यावेळी अजित पवार म्हणाले, मी स्वत: बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, रोहीत पवार यांना सोबत घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांना सांगितले की, राज्यात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. अशा काळात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या इतर लहानमोठ्या उद्योगांना चालना मिळणार होती. हजार एकर जागा तळेगाव येथे नियोजित केली होती सगळी पाहणी झाली होती. ३ लाख लोकांना त्यातून रोजगार मिळणार होता, असे असताना हा प्रकल्प राज्यातून गेला आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले की, तुमचे वरिष्ठांशी चांगले संबंध आहेत, तुम्हाला त्यांनी आशिर्वाद दिलेत, त्यामुळे तुमच्या कार्यकाळात हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राबाहेर जाता कामा नये, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT