Latest

Walking for Weight Loss : वजन कमी करण्‍यासाठी दररोज नेमकं किती पावले चालावे? जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नियमित चालणे हा एक उत्‍कृष्‍ट व्‍यायाम आहे, हे आजवरच्या अनेक संशोधनांमध्‍ये सिद्‍ध झाले आहे. त्यामुळेच शारीरिक आणि मानसिक आरोग्‍यासाठी चालणे हा एक सर्वात सोपा आणि प्रभावी व्‍यायाम प्रकार मानला जातो. मात्र वजन कमी करण्‍यासाठी दररोज किती पावले चालावे यावर नेचर मेडिसिन या जर्नलमध्ये नुकतेच नवीन संशोधन प्रकाशित झालं आहे. (Walking for Weight Loss) जाणून घेवूया या नवीन संशोधनातील माहितीविषयी…

नवीन संशोधनात ४१ ते ६७ वयोगटातील निरोगी लठ्ठ लोकांनी सहभाग नोंदवला. संशोधकांना असे आढळले की, जे लोक दिवसातून सुमारे 8,200 पावले चालतात त्‍यांचे वजन कमी होण्‍याबरोबरच अनिद्रा आणि नैराश्‍याचा त्रास कमी होण्‍याची
शक्‍यता असते. तसेच या अभ्‍यासात स्‍पष्‍ट झालं की, स्मृतिभ्रंशाचा त्रास असणार्‍या रुग्‍णांनाही व्‍यायामामुळे चांगला लाभ होतो. जास्त वजन असलेल्या सहभागींनी (ज्यांचे बीएमआय 25 ते 29 पर्यंत आहे) त्यांनी दिवसातून 11,000 पावले उचलल्यास लठ्ठ होण्याचा धोका निम्म्याने कमी होतो.

Walking for Weight Loss लठ्ठपणाचा धोका 64% कमी होऊ शकतो

ज्‍यांचा बॉडी मास इंडेक्स ( शरीराचे वजन आणि उंची यांचे गुणोत्तर ) २८ आहे अशा व्यक्तींना दररोज सुमारे 6,000 ते 11,000 पावले चालल्‍यास त्यांचा लठ्ठपणाचा धोका 64% कमी होऊ शकतो, असेही या संशोधनात नमूद करण्‍यात आलं आहे. तुमच्या उंची आणि वजनाच्या गुणोत्तरालाच बीएमआय किंवा बॉडी मास इंडेक्स म्हटलं जातं.१८ ते २५ हा नॉर्मल बॉडी मास इंडेक्स आहे. तर २५ ते ३० बॉडी मास इंडेक्सला वाढलेले वजन असे म्हणतात. ३० च्या पुढील बॉडी मास इंडेक्सला लठ्ठपणा असे म्हणतात.

अधिक वजन असलेल्‍यांनी दररोज ११ हजार पावले चालावे

प्रौढ व्‍यक्‍तीने दररोज 8,600 पावले चालल्‍याने वजन आटोक्‍यात राहण्‍यास मदत मिळते. मात्र जास्त वजन असलेले प्रौढ अतिरिक्त 2,400 पावले वाढवून म्‍हणजे दररोज ११ हजार पावले चालून आपलं वजन कमी करु शकतात, असेही नवीन संशोधनात म्‍हटलं गेले आहे. मात्र हा व्‍यायाम करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला आवश्‍यक घ्‍यावा, कारण प्रत्‍येकाचे वय आणि प्रकृती यावरुनच व्‍यायाम ठरत असतो. त्‍यामुळे कोणताही व्‍यायाम करण्‍यापूर्वी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे म्‍हत्त्‍वाचे ठरते.

नुकतेच स्‍पेनमध्‍येही चालणे आणि वजन कमी करण्‍याबाबत झालेल्‍या संशोधनातही असेच निष्‍कर्ष आढळले होते. त्‍यामध्‍येम्‍हटलं होते की, वजन कमी करण्‍यासाठी दररोज दहा हजार पावले चालणे परिणामकारक ठरते. नवीन संशोधनाविषयी अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषध विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. इव्हान ब्रिटन म्हणाले, "लोक अधिक चालण्याने त्यांचा लठ्ठपणाचा धोका कमी करू शकतात.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT