मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. दोन-तीन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त झाल्यानंतर आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल होऊ लागले आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री आठ पर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी नेते विधानभवनात दाखल झाले आहेत. भाजप आमदारांना घेऊन चार बस पोहोचल्या आहेत. काँग्रेसला काही मतदानाची आवश्यकता असून सकाळी काँग्रेस नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पहिल्या पसंतीची काही मते काँग्रेसला देण्याचे शिवसेनेने मान्य केले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांनी मतांचं गणित सुटेल, असा विश्वास मतदानापूर्वी व्यक्त केला.
दरम्यान कोणत्या उमेदवाराला किती मतांचा कोटा आहे याबाबत महाविकास आघाडीने गुप्तता पाळली आहे. भाजपला रणनीती आखण्याची संधी मिळू नये म्हणून सावधगिरी बाळगण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?