पत्नी गर्भवती होताच, पती करतो दुसरा विवाह 'हे' आहे कारण | पुढारी

पत्नी गर्भवती होताच, पती करतो दुसरा विवाह 'हे' आहे कारण

जयपूर : माणसाच्या आयुष्यात विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असतो. भारतातील कायद्यातही हिंदू धर्मानुसार एकच विवाह करण्याची परवानगी आहे. मात्र, भारतातच असे एक राज्य आहे की, तेथे पुरुष कोणत्याही अडथळ्यांविना दुसरा विवाह करतो. उल्लेखनीय म्हणजे पहिली पत्नी ज्यावेळी गर्भवती असते, त्यावेळी पती दुसरा विवाह करू शकतो; पण पुरुष दुसरा विवाह कोणत्या उद्देशाने करतो? तो उद्देशही तसा खासच आहे, असेच म्हणावे लागेल.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील देरासर गावात दुसर्‍या विवाहाची परंपरा वर्षांनुवर्षे चालत आलेली आहे. सात जन्माची साथ न सोडण्याचे वचन देणारा पती हा पत्नी गर्भवती होताच दुसरा विवाह करतो. याचे कारण म्हणजे पाणी. केवळ पाण्यामुळेच गर्भवती पत्नी आपल्या पतीस दुसरा विवाह करण्यास कोणतेही आढवेढे न घेता परवानगी देते. देरासर गावाच्या परिसरात नेहमीच वर्षभर पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते.

तेथील महिला मोठे अंतर पायपीट करून पाणी आणत असतात; पण एखादी विवाहिता गर्भवती झाली की तिला लांब अंतरावरून घरी पाणी आणणे जमत नाही. अशा स्थितीत घरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून ती विवाहिता आपल्या पतीला चक्‍क दुसरा विवाह करण्यास परवानी देते. एकदा का पतीचा विवाह झाला की, पहिली पत्नी घरी आराम करते आणि दुसरी पत्नी घरी पाणी भरण्याचे काम करते.

Back to top button