देहुरोड : पालखी सोहळ्यानिमित्त देहू परिसरातील वाहतुकीत बदल | पुढारी

देहुरोड : पालखी सोहळ्यानिमित्त देहू परिसरातील वाहतुकीत बदल

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा :  आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू येथून पंढरपूरकडे सोमवारी (दि.20) प्रस्थान ठेवणार आहे. त्यानिमित्त देहूतील तसेच देहूकडे येणार्‍या मार्गात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

हे अंतर्गत मार्ग वाहतुकीस बंद :

देहू रोड कमान ते परंडवाल चौक हा रस्ता बंद राहील. पर्यायी रस्ता :भक्ती शक्ती चौक- तळवडे चौक- कॅनबे चौक- खंडेलवाल चौक मार्गे देहू.

तळवडे गावठाण रस्ता- कॅनबे चौक-महिंद्रा सर्कल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद. पर्यायी रस्ता : चिखली गावठाण- डायमंड चौक – मोईमार्गे निगोजेकडे जातील.

तळेगाव चाकण रस्त्यावरून देहू फाटा मार्गे देहूकडे येणारे रस्त्यावरील जड वाहतूक बंद. पर्यायी रस्ता : एचपी मार्गे इच्छितस्थळी जातील.

परंडवाल चौक-देहू कमान-खंडेलवाल चौक सर्व वाहनांसाठी बंद.

व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांसाठी मार्ग सुरू राहील.

परंडवाल चौक ते 14 टाळकरी कमान सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. पुणे मुंबई महामार्ग सेंट्रल चौक ते निगडी दरम्यान संपूर्ण बंद राहील. पर्यायी रस्ता : सेंट्रल चौक- विकास नगर-किवळे – भूमकर चौक यामार्गे इच्छित स्थळी.
(हे बदल 20 व 21 रोजी करण्यात आले आहेत.)

हे बाह्य मार्ग वाहतुकीस बंद : 

देहूरोड ते देहू हा मार्ग दिंडीच्या वाहनांव्यतिरिक्त जड वाहनांसाठी बंद राहील. देहूकडे येणारा तळेगाव-चाकण रस्ता जड वाहनांसाठी बंद राहील. केवळ पास असलेली वाहने सोडण्यात येतील.

भाविकांसाठी निगडी, तळवडे, कॅनबे चौक व देहू असा मार्ग असेल. पीएमपीच्या बसेस 20 तारखेस परंडवाल चौकापर्यंत धावतील. 21 तारखेला सेंट्रल चौकातून निगडीपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येईल. वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

इथे पार्किंगची व्यवस्था: 

तळेगाव- इंदोरी मार्गाने देहूत येणार्‍या बायपास रस्त्यावर देहूगाव मैदान, ओम डेव्हलपर्स येथे पार्किंग असेल.
तळवडेच्या दिशेने येणारी वाहने दिगंबर कन्स्ट्रक्शन खंडेलवाल चौक येथे थांबतील.

 

 

Back to top button