Latest

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत अजब प्रकार; मतपेटीत सापडल्या मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या अन् पैसे…

दीपक दि. भांदिगरे

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूक मतमोजणीला आज शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतपेट्या उघडताच त्यात मतदारांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. या चिठ्ठ्यांमध्ये काही मतदारांनी नेते, उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. 'आम्हाला वाटायचं साहेबांचे कार्यकर्ते भाजप वाढवत आहेत. पण साहेब सुद्धा…आता काय?. सर्व उमेदवार राजकारणी असून आज एकमेकांवर पकड करत आहेत. पण निवडणूक झाल्यानंतर पुन्हा गळ्यात गळे घालणारे स्वार्थी लोक बँकेवर कायम राहणार. त्यासाठी प्रशासक असणे आवश्यक आहे,' असे मतदारांनी लिहिले आहे.

'उद्यापासून समरजितदादा सर्वसामान्य लोकांची डोकी फोडण्यासाठी तालुका फिरायला मोकळे', असे एका चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. तर चक्क एका मतदाराने मतपेटीत टाकलेले पन्नास रुपये मतमोजणीवेळी सापडले. हा विषय मतदान केंद्रावर खूप चर्चेचा ठरला आहे.

जिल्ह्यातील १३ ठिकाणी ४० केंद्रांवर ७ हजार ६५१ पैकी तब्बल ७ हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात १०० टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात ४४८ पैकी ४४६, पतसंस्था गटात १२२१ पैकी १२०७, इतर संस्था गटात ४११५ पैकी ३९९५ असे सरासरी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना लागून राहिली आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : या राजकीय घडामोडींनी गाजले 2021 साल | Rewind 2021

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT