Volcanoes under sea 
Latest

Volcanoes under sea | समुद्राच्या तळाशी तब्बल १९ हजारांहून अधिक ज्वालामुखी- संशोधनातील माहिती

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : पृथ्वीवर जवळपास ७० टक्के पाणी आहे. यामधील बहुतांश भाग हा समुद्राच्या पाण्याने व्यापलेला आहे. समुद्राच्या तळाशी जावून तेथील साधनसंपत्तीचा शोध घेणे अवघड आहे. समुद्राच्या तळाशी काय दडलंय हे सांगणे सोपे नाही. पण आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रहांच्या मदतीने वैज्ञानिकांनी आता महासागरांची खोलीचा (Volcanoes under sea) अभ्यास केला आहे. वैज्ञानिकांनी रडार सॅटेलाईटच्या मदतीने समुद्राच्या तळाचे रहस्य उलगडले आहे. यामध्ये पृथ्वीवरील समुद्राच्या तळाशी १९ हजारांहून अधिक ज्वालामुखी असल्याचे संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Earth and Space Science या जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिकांनी रडार उपग्रहाच्या माध्यमातून समुद्राच्या तळाखाली असलेल्या खडकांचा (Volcanoes under sea) अभ्यास केला आहे. यामध्ये ज्वालामुखीय खडकांचा देखील समावेश असून, १९ हजारांहून अधिक ज्वालामुखी समुद्राच्या पाण्याखाली लपल्याची माहिती अर्थ अँड स्पेस सायन्स या जर्नलमध्ये देण्यात आलेली आहे.

(Volcanoes under sea) या संशोधनाविषयी अधिक माहिती देताना वैज्ञानिक सांगतात की, या संशोधनासाठी नवीनतम गुरुत्वाकर्षण ग्रेडियंट नकाशांचा वापर करण्यात आला आहे. या नकाशांच्या मदतीने वैज्ञानिकांनी समुद्राखालील १९ हजार ३२५ नवीन सागरी खडकांचा शोध घेतला आहे. हे खडक ज्वालामुखी खडक म्हणून ओळखण्यात आल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

समुद्राच्या तळामध्ये अनेक प्रकारचे टेक्टोनिक (Volcanoes under sea) वैशिष्ट्ये आहेत. समुद्राच्या तळात मैलांवर पसरलेली शिखरे किंवा टेकड्या, अथांग टेकड्या, म्हणजे अथांग खोलीचे पसरलेले पर्वत टेकड्यांसह, ज्वालामुखी खडक देखील असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हे ज्वालामुखी सक्रिय असू शकतात किंवा निश्क्रिय देखील असू शकतात. या ज्वालामुखी खडकांची उंची साधारण १ हजार मीटर असल्याचे वैज्ञानिकांनी संशोधानातील माहितीनुसार स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT