

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
लंडन : ज्वालामुखी हे पृथ्वीवरील असे क्षेत्र आहेत, ज्याच्या आत अतिउष्ण लाजव्हा, वायू इत्यादींचा मोठा साठा असतो. ज्यावेळी त्यांचा स्फोट होतो, तेव्हा त्याचा प्रभाव अनेक मैलांपर्यंत दिसून येतो. जगात सर्वात जास्त ज्वालामुखी इंडोनेशियामध्ये असल्याचे म्हटले जाते. तेथील सर्वात मोठ्या माऊंट सेमेरू ज्वालामुखीचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये उद्रेक झाला होता. या ज्वालामुखीतून लाव्हासोबत बाहेर पडणार्या राख आणि धुरामुळे 8 किमी क्षेत्र प्रभावित झाले होते.
जगभरात ज्वालामुखी मोठ्या प्रमाणात आहेत. यातील 13 ज्वालामुखी 800 किमी उंचीवरूनही दिसू शकतात. युरोपियन स्पेस एजन्सीने (इएसए) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात जगातील 13 ज्वालामुखी दाखवण्यात आले आहेत, जे अंतराळातूनही पाहता येतात.
[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]
ईएसएने शेअर केलेला व्हिडीओ 12 मिनिटांचा आहे. तो पाहिल्यानंतर ज्वालामुखी मोठे क्षेत्र भाग व्यापू शकतात, याची प्रचिती येते. उल्लेखनीय म्हणजेे अंतराळात 800 किमी उंचावरूनही पाहिले जाऊ शकतात. खरे तर, जगातील मोठ्या 13 ज्वालामुखींना उपग्रहांनी टिपले. माऊंट फुजी ते माऊंट मेयॉन आणि माऊंट वेसुवियस या ज्वालामुखींचा हा व्हिडीओ आहे. ईएसएने सांगितले की, पृथ्वीपासून सुमारे 800 किलोमीटरवर कार्यरत असलेले उपग्रह सध्या ज्वालामुखींवर नजर ठेवून असतात. यामुळे ज्वालामुखींचा रिअल-टाईम डेटा उपलब्ध होतो व तशी गरज पडल्यास तातडीने मदतकार्य करणे सोपे होते.