Latest

Vodafone Layoffs | १ लाख रोजगार देणाऱ्या व्होडाफोनमध्ये नोकरकपात, शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ?

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जगभरात विविध समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या व्होडाफोन या दूरसंचार कंपनीने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना (Vodafone Layoffs) काढून टाकण्याची योजना आखली आहे. या नोकरकपातीचा फटका बहुतांशी लंडनच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचे वृत्त फायनान्शियल टाइम्सने दिले. कंपनीची ही गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी नोकरकपात असेल, असे जाणकारांचे मत आहे.

बाजारातील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, व्होडाफोनने गेल्या नोव्हेंबरमध्ये खर्चकपातीची घोषणा केली होती. २०२६ पर्यंत आपण १.०८ अब्ज डॉलरचा खर्च कमी करू असे कंपनीने म्हटले होते. स्पेनमधील टेलिफोनिका आणि फ्रान्समधील ऑरेंज यासारख्या अनेक दूरसंचार कंपन्यांच्या मूल्यांकनात सध्या जवळपास ५० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे जगभरात हा खर्चबचतीचा कल असल्याचे दिसून येत आहे. ऊर्जेच्या वाढत्या किमती आणि जास्तीचे व्याजदर यामुळेही या उद्योगावर प्रचंड दबावआला आहे.

जागतिक स्तरावर व्होडाफोनचे सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी आहेत. त्यांतील काहीशे जणांना नारळ देण्याचे कंपनीचे नियोजन आहे. भारतातील किती जणांना घरी जावे लागेल, याचा तपशील अद्याप समजलेला नाही. भारतात व्होडाफोनची आयडिया या ब्रँडशी भागीदारी आहे. वी या नावाने या दोन्ही कंपन्या भारतात संयुक्त सेवा देतात.

व्होडाफोनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निक रीड यांना अकार्यक्षमतेच्या आरोपांमुळे २०२२ च्या अखेरीस राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या कार्यकाळात कंपनीचे मूल्य ४० टक्क्यांनी घसरले होते. त्यानंतर कंपनीने आपले खर्च कपातीचे धोरण निश्चित केले. व्होडाफोनने हंगेरीमधील आपला व्यवसाय तेथील फोर आयजी या नावाच्या स्थानिक आयटी कंपनीला व हंगेरियन सरकारला १.८२ अब्ज डॉलरमध्ये विकण्याचेही ठरविले आहे. (Vodafone Layoffs)

 हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT