पुढारी ऑनलाईन डेस्क
ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल ते द काश्मीर फाइल्स या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटातून काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराचे दारुण आणि वास्तववादी चित्रण दाखवले आहे. 'द कश्मीर फाईल्स' हा गेल्या काही दशकांतील असा पहिलाच चित्रपट असावा, जो प्रेक्षकांनी केवळ पाहिला नाही तर तो अनुभवलादेखील आहे. प्रत्येक प्रेक्षकाला चित्रपटातील प्रत्येक दृश्य आणि संवाद खिळवून ठेवतात. ज्या लोकांच्या कुटुंबात ही घटना घडली आहे, ते त्यांचा भूतकाळ या चित्रपटातून प्रतिबिंबित होताना दिसला. त्यामुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
असा एकही प्रेक्षक नसेल ज्याच्या डोळ्यातून हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्रूधारा वाहिल्या नसतील, असे म्हणायला हरकत नाही. चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ते पाहून त्यांच्या मनातील वेदना, दु:ख जाणवतात.
असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट हॉलमधून बाहेर पडते. जवळच उभे असलेले चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या पायाला ती स्पर्श करते. कदाचित त्या स्त्रीच्या भावना, वेदना या प्रसंगातून बाहेर पडल्या असाव्यात. स्वत: अग्निहोत्री यांनी या प्रसंगाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे.
चित्रपट हॉलमधून बाहेर पडल्यानंतर एक महिला अग्निहोत्रीच्या पाया पडत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अग्निहोत्रीने त्यांना अभिवादन केले. याचवेळी महिला हात जोडताना दिसते. ती ढसाढसा रडते. विवेक अग्निहोत्रीला म्हणते, तुझ्याशिवाय कोणीही करू शकत नाही. अशाच प्रकारे आमच्या काकांची हत्या झाली. आम्ही हे सर्व पाहिले आहे."
असाच आणखी एक व्हिडिओ विवेक रंजनने त्याच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले की, टूटे हुए लोग बोलते नहीं उन्हें सुना जाता है…