जांभूळचे आरोग्यसाठी फायदेशिर Pudhari File Photo
विश्वसंचार

वजन घटविण्यापासून हृदयापर्यंत... जांभूळ आहे अनेक प्रकारे गुणकारी

जांभळाचे सेवन: शरीराच्या विविध आरोग्य समस्यांवर गुणकारी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : रसाळ फळांचा विचार केला, तर त्यात जांभूळ या छोट्याशा फळाचाही समावेश आहे. चवीला गोड आणि आंबट, गडद जांभळ्या रंगाच्या जांभूळमध्ये भरपूर पोषक घटक असतात. दिवसातून मूठभर जांभूळ खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. वजन घटवण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत अनेक बाबतीत हे छोटेसे फळ मदत करते.

जांभूळाने वजन कमी होण्यासही मदत

जांभूळहे लो कॅलरी फूड आहे आणि त्यात जास्त प्रमाणात यटोकेमिकल्स असतात. तसेच फ्रक्टोज आणि ग्लुकोज कमी प्रमाणात आढळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज वाढण्याचा धोका कमी होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. याशिवाय फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या दूर होते. जांभूळचे नियमित सेवन केल्याने पचन आणि चयापचय नियंत्रित होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जांभळाच्या सेवनाने शरीराला पोटॅशियम मिळते. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका टाळता येतो. यूएसडीए नुसार, 100 ग्रॅम जांभूळ 79 मिलिग्राम पोटॅशियम प्रदान करते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात टाळता येतो.

जांभूळ खाल्ल्याने शरीराला मिळते व्हिटॅमिन सी

जांभूळ खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम व्यतिरिक्त पॉलिफेनॉल मिळतात. याचे सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, हे फळ मधुमेहाच्या उपचारात खूप फायदेशीर आहे. जांभूळ खाल्ल्याने कार्बोहायड्रेटस्चे उर्जेमध्ये रूपांतर होण्यास मदत होते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांनी उन्हाळ्यात जांभूळचे सेवन करावे. यामुळे वारंवार लघवीला जाणे आणि तहान लागणे ही समस्या दूर होते.

जांभूळचे सेवनाने श्वासाची दुर्गंधी दूर होते

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या जांभूळचे सेवन केल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि कॅव्हिटीपासून आराम मिळतो. याशिवाय श्वासाची दुर्गंधीही दूर होऊ शकते. जांभूळशिवाय त्याची पाने आणि बियांची पावडरदेखील दातांसाठी खूप प्रभावी आहे. जांभूळमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळते. यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो, ज्यामुळे त्वचेवर फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी होतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सीचे प्रमाण त्वचेतील कोलेजन वाढवून त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने त्वचेवरील डाग कमी होतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT