कोकण पदवीधर निवडणूक: डावखरे यांची विजयाची हॅटट्रिक

दुसऱ्या फेरीअखेर डावखरे यांना ५९ हजार मते
Niranjan Davkhare  victory
भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. Pudhari News Network

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण पदवीधर मतदार संघातून महायुती भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी विजयाची हॅटट्रिक केली. डावखरे यांना ५९००० मते पडली आहेत. एकूण १, ४३, २९७ मतदानापैकी आतापर्यंत दुसऱ्या फेरीअखेर ८४, ००० मते मोजली आहेत.

डावखरे यांची विजयाची हॅटट्रिक

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत झाली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. यामध्ये भाजपला विजय मिळाला आहे. विद्यामान आमदार निरंजन डावखरे यांनी विजयाची घौडदौड कायम राखत विजयी हॅट्रिक मिळवली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news