विश्वसंचार

चेतासंस्थेतील विकाराचा आता डीएनए टेस्टने लागेल छडा

सोनाली जाधव

लंडन : न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच चेतासंस्थेशी संबंधित विकाराचा छडा आता एक सामान्य डीएनए चाचणीतूनही लावता येऊ शकेल. आजाराचे निदान करण्यासाठी जीनोम सिक्‍वेन्सिंगच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेची गरज राहणार नाही.

जीनोमिक इंग्लंड आणि क्‍वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये अनेक वर्षांपासून हनटिंग्टन रोगावर संशोधन केले जात होते. या शोधामध्ये डीएनएच्या नव्या तंत्राची माहिती समजली. आतापर्यंत न्यूरो डिसऑर्डरच्या कारणांना शोधणे अतिशय कठीण बनले होते. याचे कारण म्हणजे अनेक वेळा या आजाराची लक्षणे अनुवंशिक रूपात मिळत नाहीत. त्यामुळे लक्षणे शोधण्यातच अनेक वर्षे जात होती.

मात्र, डीएनए आधारित नव्या संशोधनानुसार आता अशा रोगाचे अचूकपणे निदान होऊ शकेल. क्‍वीन मेरी विद्यापीठाचे प्रा. मार्क कॉलफिल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार या आजाराचे वेळीच निदान झाल्याने त्यावर चांगले उपचारही होऊ शकतील. डॉ. एरियाना टुची यांनीही म्हटले आहे की या नव्या शोधानुसार न्यूरो डिसऑर्डरशी संबंधित जीन किंवा जनुकाचा डीएनए अ‍ॅल्गोरिदमने छडा लावता येऊ शकतो.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT