विश्वसंचार

कॅलिफोर्निया : वेगात चालल्याने 34 टक्के घटतो ‘हार्टफेल’चा धोका

सोनाली जाधव

कॅलिफोर्निया : वेगात चालल्याने 'हार्टफेल' होण्याचा धोका 34 टक्के घटतो, असा दावा एका अमेरिकन संशोधनात करण्यात आला आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीने सुमारे दोन दशके महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनानंतर हा दावा केला आहे.

हार्टफेलचा धोका कमी करता येऊ शकतो.

वाढत्या वयानुसार हृदयासंबंधीच्या धोक्यातही वाढ होत असते. मात्र, रोज चालण्याच्या व्यायामामुळे हार्टफेलचा धोका कमी करता येऊ शकतो. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुमारे 25 हजारांहून अधिक वयस्क महिलांवर सुमारे दोन दशके हे संशोधन केले आहे. यादरम्यान सुमारे 1445 महिलांचे हार्टफेल झाले. हार्टफेल म्हणजे संपूर्ण शरीरात रक्‍ताला पंप करण्याची क्षमता हृदयात नसणे.

'अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटी जर्नल'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. संशोधनात सहभागी महिलांना त्यांच्या चालण्यासंबंधीच्या सवयीबाबत प्रश्‍न विचारण्यात आले. त्यांच्या उत्तरांच्या आधारावर रिपोर्ट तयार करण्यात आले. तसेच त्यांच्यावर दोन दशके नजर ठेवण्यात आली होती. यामध्ये असे आढळून आले की, ज्या महिला वेगाने चालण्याचा व्यायाम करत होत्या, त्यांच्यामध्ये हार्टफेलचा धोका 34 टक्यांनी कमी होता.

संशोधक डॉ. चार्ल्स एटॉन यांच्या मते, वाढत्या वयानुसार शरीराला रक्‍तपुरवठा करण्याच्या हृदयाच्या क्षमतेवर परिणाम होत असतो. मात्र, चालण्याचा नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील अनेक बदलांमुळे हा धोका कमी करता येऊ शकतो.

हेही वाचलतं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT