वॉशिंग्टन : सूर्यमालेची निर्मिती कशी आणि केव्हा झाली? याचे ठोस उत्तर शोधण्याचा प्रयत्न सातत्याने शास्त्रज्ञ करत असतात. या प्रयत्नांच्या माध्यमातून नव नवी माहितीही मिळण्यास मदत होते. यासंबंधी करण्यात आलेल्या नव्या संशोधनातील निष्कर्षानुसार धडकेमुळे ग्रहावर बनलेले 'इम्पॅक्ट क्रेटर'ही आकाशमालेच्या निर्मितीचे रहस्य उघडू शकतात.
सूर्यमालेचा इतिहास, तारे, ग्रह, त्यांचे चंद्र, लघुग्रह आणि उल्कापिंडांची संरचना यासंबंधीची माहिती आता 'इम्पॅक्ट क्रेटर' देऊ शकतील, असे मत खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या 'इम्पॅक्ट क्रेटर'चा अभ्यास करणारे पर्ज युनिव्हर्सिटीमधील कॉलेज ऑफ सायन्सचे अर्थ अॅटमोस्फेअरिक अँड प्लॅनेटरी सायन्स विभागातील असो.
प्रोफेसर ब्रँडन जॉन्सन यांच्या मते, इम्पॅक्ट क्रेटरची निर्मिती ही ग्रहांना आकार देणारी एक प्रक्रिया आहे. असे 'क्रेटर' अथवा 'विवर' हे प्रत्येक ठोस खगोलीय पिंडांमध्ये दिसून येते. हेच विवर ग्रहांमध्ये होणार्या बदलाचे प्रमुख कारण असते. याशिवाय या विवरांमुळेच ग्रहांच्या वरील थराचा विकास होतो. यामुळे अशा इम्पॅक्ट क्रेटर्सचा सविस्तर अभ्यास केल्यास सूर्यमालेच्या निर्मितीबाबतचे गूढ उलगडू शकते.
जॉन्सन यांनी सूर्यमालेतील सर्व मोठ्या ग्रहीय पिंडांचा अभ्यास केला आहे. सुरुवातीच्या आणि अलीकडच्या काळात ग्रहांवर झालेल्या धडकांचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. या संशोधनासाठी त्यांनी भौतिकी, गणित आणि संगणकीय मदत घेतली. यातूनच त्यांनी असा निष्कर्ष काढला की, धडकेमुळे ग्रहांवर निर्माण झालेल्या क्रेटरचा आणखी अभ्यास केल्यास सूर्यमालेच्या निर्मितीसंबंधीचे गूढ उलगडणे शक्य आहे.
हेही वाचलंत का?