विश्वसंचार

आईच्या गर्भातून बाळाने दोनवेळा घेतला जन्म

अनुराधा कोरवी

न्यूयॉर्क ः अमेरिकेत एका बाळाने आपल्या आईच्या पोटातून दोनवेळा जन्म घेतला आहे. वैद्यकीय विज्ञानातील हा अनोखा चमत्कार पाहून लोक चकीत झाले. डॉक्टरांनी एकदा या बाळाला शस्त्रक्रिया करून आईच्या गर्भातून बाहेर काढले होते व नंतर पुन्हा गर्भात सोडले. त्यानंतर अकरा आठवड्यांनी या बाळाने पुन्हा जन्म घेतला.

फ्लोरिडामध्ये राहणार्‍या या बाळाच्या आईने एका अपत्याला दोनवेळा जन्म देण्याचा अनुभव सोशल मीडियातून शेअर केला आहे. जेडेन अ‍ॅश्‍ले असे या महिलेचे नाव. तिच्या गर्भात वाढणार्‍या बाळाच्या मणक्यात काही समस्या होती व ती ठीक केली नाही तर त्याच्या जीवालाही धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी या प्री-मॅच्युअर बेबीला आईच्या गर्भातून बाहेर काढून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली व त्याला पुन्हा एकदा आईच्या गर्भात सोडले. त्यानंतर दोन महिन्यांनी या मुलाचा जन्म झाला.

आता त्याच्या मणक्यात कोणतीही समस्या नव्हती. मात्र, अजूनही त्याला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. बर्‍याच वेळा बाळाच्या जन्मानंतर समजते की त्याला काही जन्मजात समस्या आहेत. अशा वेळी बाळ आणि आई-वडिलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत 'ओपन फोएटल सर्जरी' एखाद्या वरदानासारखीच ठरते. त्यामध्ये बाळावर त्याच्या खर्‍या जन्माआधीच शस्त्रक्रिया केली जाते. अर्थात असे ऑपरेशन कठीण असते व त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे खास पथक असावे लागते.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT