विश्वसंचार

अर्जेंटिनामध्ये सापडले विशाल प्राण्याचे अवशेष

backup backup

ब्यूनस आयर्स ः लॅटिन अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये केलेल्या एका उत्खननावेळी डायनासोरच्या काळातील 'मृत्यूचा ड्रॅगन'च असलेल्या एका सरीसृपाचे अवशेष सापडले आहेत. हे जीवाश्म तब्बल 8 कोटी 60 लाख वर्षांपूर्वीचे आहे. या जीवाश्माची लांबी 30 फूट असून, हा लॅटिन अमेरिकेत सापडलेला सर्वात मोठा टेरोसोर आहे.

उड्डाण करू शकणार्‍या सर्वात मोठ्या पृष्ठवंशीय प्राण्यांपैकी तो एक असून, हा प्राणी अतिशय भयावह होता, असे संशोधकांनी म्हटले आहे. प्रागैतिहासिक काळात हा जीव एक घातक शिकारी म्हणून वावरत होता. मेक्सिकोच्या जवळ पृथ्वीला लघुग्रहाची धडक होण्यापूर्वी सुमारे दोन कोटी वर्षांपर्यंत या जीवाचे अस्तित्व होते. या लघुग्रहाच्या धडकेने 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील तीन चतुर्थांश जीव नष्ट झाले होते.

पुरातत्त्व संशोधकांच्या एका टीमने अर्जेंटिनाच्या पश्चिम प्रांत मेडोजा अंडेस पर्वतावर या जीवाश्माचा शोध घेतला आहे. मुख्य संशोधक लिओनार्डो ओरटिज यांनी सांगितले की, या जीवाश्मात जी वैशिष्ट्ये दिसून आली ती यापूर्वी पाहण्यात आली नव्हती. त्याला 'डेथ ड्रॅगन' असेच संबोधले जात आहे. त्याचा आकार एखाद्या स्कूल बसइतका होता. त्याचे पंख 30 फूट लांबीचे होते. उत्खननात त्याची 40 हाडे व अन्य अवशेष सापडले आहेत.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT