नवी दिल्ली : वेफर्स (wafers) किंवा फ्लेवर्ड चिप्सचे पाकीट घेऊन फोडल्यावर अनेकांची निराशाच होत असते. याचे कारण म्हणजे त्यामध्ये वेफर्स (wafers) कमी आणि हवाच अधिक भरलेली असते! मात्र इतकी हवा अशा पाकिटांमध्ये का भरलेली असते हे ठावूक आहे का? यामागेही एक शास्त्रीय कारण आहे.
चिप्सच्या पाकिटांमध्ये असणारी हवा म्हणजे नायट्रोजन वायू. याच वायूमुळे पाकिटात असणारे चिप्स अधिक कुरकुरीत राहतात आणि दीर्घकाळ टिकतात. शिवाय त्यांची चवही टिकून राहते. आहारतज्ज्ञांच्या मते ग्राहकांना ताज्या, संपूर्ण स्वरूपात असणार्या (न तुटलेल्या) आणि कुरकुरीत पदार्थांचं सेवन करणे आवडते. थोडक्यात जर वेफर्सच्या पाकिटांमध्ये हवा भरली नाही, तर ते कुरकुरीत राहणार नाहीतच, शिवाय त्यांचा आकारही बिघडून जाईल. ग्राहकांची अशा उत्पादनांना मुळीच पसंती नसेल, त्यामुळं बर्याच कंपन्या नायट्रोजनचा वापर करतात.
वेफर्सच्या पाकिटांमध्ये हवा किंवा नायट्रोजन वायू भरणे त्या त्या कंपन्यांसाठी अत्यंत फायद्याचं असतं. इथं ग्राहकांच्या मानसितेचा मुद्दा लक्षात घेतला जातो. एखादी व्यक्ती कधीच अर्धवट तुटलेल्या, विचित्र अवस्थेत असलेल्या पदार्थाची चव घेणार नाही. शिवाय खाद्यपदार्थांची पाकिटं घेत असताना ते मोठ्या आकारालाही प्राधान्य देतात. त्यामुळे सुद्धा ही पाकिटं फुलवलेली असतात. असे न केल्यास कंपन्यांचे मोठं नुकसान होईल आणि त्यांच्या उत्पादनांची विक्री होणार नाही.
.हेही वाचा