विश्वसंचार

Plastic pollution : आर्क्टिकमधील प्लास्टिक प्रदूषणही आता झाले गंभीर

मोनिका क्षीरसागर

बर्लिन : जगातील सर्वात निर्जन आणि बर्फाळ प्रदेशांपैकी एक आहे आर्क्टिक. या उत्तर ध्रुवाच्या परिसरातील प्लास्टिक प्रदूषणही आता गंभीर स्थितीत गेले असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीवरील अन्य भागांइतकीच गंभीर स्थिती याठिकाणीही बनलेली आहे.

या परिसराचा विकास किंवा तेथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्याच्या मार्गात तेथील खडतर हवामान कारणीभूत ठरले आहे. मात्र, तरीही हा प्रदेश हवामान बदलाच्या संकटाशी झुंजत आहे. आर्क्टिक महासागराच्या किनार्‍यावर सहा देश आहेत. त्यामध्ये रशिया, कॅनडा, अमेरिका, डेन्मार्क, नॉर्वे आणि आइसलँडचा समावेश होतो. आतापर्यंत निर्जन राहिलेला हा भाग आता माणसांनी गजबजू लागला असल्यानेही संकट वाढले आहे.

एका नव्या पाहणीतून दिसून आले की, वारे, लाटा आणि नद्यांच्या माध्यमातून आर्क्टिक महासागराच्या उत्तरेत कपडे, पर्सनल केअर प्रॉडक्टस, पॅकेजिंग आणि दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू वाहून येत आहेत. पाण्यात, समुद्रतळाशी, दुर्गम भागातील समुद्रकिनार्‍यांवर तसेच नद्या आणि बर्फातही आता मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून येत आहे. जर्मनीच्या आल्फेड वेगेनर इन्स्टिट्यूटच्या एका इंटरनॅशनल रिव्ह्यू स्टडीनुसार आर्क्टिकसारखा भागही आता प्लास्टिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असून, ही बाब चिंताजनक आहे.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT