विश्वसंचार

Korea : बाप-लेकीला पाहून संतापले कोरियन लोक

Arun Patil

प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये (Korea) हुकूमशाह किम जोंग उन याच्या राजवटीत लोक जीव मुठीत घेऊनच जगत आहेत. एकीकडे लोकांची उपासमार होत असताना किमचे कुटुंब मात्र विलासी जीवन जगत आहे. त्यामुळे एका कार्यक्रमात किम व त्याची लेक आल्यावर दोघांचे 'खाते-पिते घर के' थाटाचे चेहरे पाहून लोक संतापले. किम तर स्वतः जाडजूड आहेच; पण त्याची मुलगीही गोबर्‍या गालाची, गुटगुटीत आहे.

अलीकडेच किम जोंगने इंटरकाँटिनेंटल बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी घेतली. त्यावेळी त्याच्यासमवेत त्याची कन्याही होती. (Korea) कोरियन टी.व्ही.वर दोघांचे छायाचित्र झळकू लागल्यावर लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. आम्ही दोनवेळेच्या जेवणालाही महाग झालो असताना किमचे कुटुंब मात्र मजेत जगत आहे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. मीडिया रिपोर्टस्नुसार तेथील लोकांनी म्हटले की हुकूमशाह किमचे कुटुंब ऐशोरामात राहत आहे. त्यांच्यासाठी अनेक सुखसुविधा उपलब्ध आहेत; पण देशातील सर्वसामान्य जनता हालअपेष्टा सहन करीत आहे. त्यांच्याकडे रोजगार नाही की उत्पन्नाचे साधनही नाही.

हुकूमशाहाच्या मुलीचे गोबरे गाल व लठ्ठपणा पाहिल्यावरच हे कुटुंब किती विलासी जीवन जगत आहे हे लक्षात येते असे त्यांचे म्हणणे आहे. ही मुलगी शाळेत जात नाही तर तिला शिकवण्यासाठी घरीच शिक्षक येतात. वेळ घालवण्यासाठी ती घोडसवारी, पोहणे असे छंद जोपासते. तिच्या संरक्षणासाठी खतरनाक गार्ड तैनात असतात. असे म्हटले जाते की किमला तीन अपत्ये आहेत. त्यांचे वय सहा, दहा आणि तेरा वर्षे आहे. किमनंतर त्याची वारस हीच कन्या बनणार आहे. अलीकडे अनेक वेळा ती आपल्या पित्यासमवेत दिसून आली आहे.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT