विश्वसंचार

Charles Darwin : रंगबदल सिद्धांताची ‘एआय’ने झाली पुष्टी

मोनिका क्षीरसागर

न्यूयॉर्क : चार्ल्स डार्विन यांनी दोनशे वर्षांपूर्वी 'लाँग हेल्ड थिअरी' मांडली होती. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेने केलेल्या परीक्षणात त्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. भूमध्य समुद्राच्या परिसरातील पक्षी अधिक रंगीबेरंगी असतात, असे डार्विनने म्हटले होते. ध्रुवीय भागांच्या दिशेने गेलेल्या पक्ष्यांचा रंग भुरकट होऊ लागतो.

या सिद्धांताच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी स्टेनफोर्ड विद्यापीठातील बायोसायन्स विभागाचे डॉ. चरिस कुने व डॉ. गोविन थॉमस यांनी नेचर हिस्ट्री संग्रहालयातील 4,527 प्रजातींच्या 24,345 पक्ष्यांच्या नमुन्यांचे अध्ययन केले. त्यासाठी वेगवेगळ्या स्थितीमधील पक्ष्यांची छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यानुसार भूमध्य सागरी क्षेत्रातील पक्ष्यांचा रंग ध्रुवीय पक्ष्यांच्या तुलनेत अधिक गडद व वैविध्यपूर्ण असल्याचे दिसून आले. यामुळे जैवविविधतेचा अधिक बारकाव्यासह अभ्यास करणे शक्य होणार आहे.

डार्विनने याबाबत अठराव्या शतकात सिद्धांत मांडला होता. एकोणिसाव्या शतकातही काही संशोधकांनी असाच दावा केला होता. मात्र, त्याची अद्याप पुष्टी झालेली नव्हती. भूमध्य सागरी क्षेत्रातील पक्षी रंगीबेरंगी असतात हेच माहिती होते. नव्या संशोधनात या भागातील मादी पक्ष्यांचा रंग जास्त गडद असल्याचे दिसून आले. नर पक्ष्यांचा रंग तुलनेने फिकट स्वरुपाचा असतो.

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT