विश्वसंचार

ब्रिटननेही बनवला ‘प्रतिसूर्य’!

backup backup

लंडन पुढारी वृत्तसेवा : चीनमधील नकली सूर्य म्हणजेच न्यूक्लिअर फ्यूजनची जगभर चर्चा झाली. आता बिटिश संशोधकांनीही असा 'प्रतिसूर्य' चर्चेत आला आहे. प्रॅक्टिकल न्यूक्लिअर फ्यूजनच्या एका प्रयोगात त्यांना मोठे यश आले आहे. सूर्याच्या पद्धतीने न्यूक्लिअर फ्यूजन काम करू शकते. या संयंत्रातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळू शकते. त्यामुळेच त्याला 'प्रतिसूर्य' म्हटले जाते.

भविष्यात तार्‍यांच्या शक्तीचा वापर करून स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा मिळवण्याच्या दिशेने हा प्रयोग म्हणजे मैलाचा दगड मानला जात आहे. याद्वारे पृथ्वीवर 'छोटे सूर्य' तयार केले जाऊ शकतात. मध्य इंग्लंडच्या ऑक्सफर्ड जॉईंट युरोपियन टोरस (जेट) प्रयोगशाळेने गेल्यावर्षीच्या अखेरीस संयंत्रातून 59 मेगाजूल ऊर्जेची निर्मिती केली. याबरोबरच 1997 चा आपलाच विक्रम या संयंत्राने मोडला. यावेळी विश्वविक्रमाहून दुप्पट ऊर्जानिर्मिती करण्यात आली.

21 डिसेंबर रोजी मोठ्या ऊर्जानिर्मितीची नोंद झाली. यामधून स्वच्छ, स्वस्त ऊर्जा देण्याची फ्यूजन क्षमता आता जगासमोर आली आहे. एवढी ऊर्जानिर्मिती करण्यासाठी 14 किलो टीएनटीचा वापर करावा लागतो. बिटनचे विज्ञानमंत्री जॉर्ज फ्रीमॅन यांनीही या संशोधनाचे कौतुक केले आहे. न्यूक्लिअर फ्यूजन ही प्रक्रिया सूर्यासारखीच आहे. सूर्य अशाच प्रकारे उष्णतेची निर्मिती करतो. ही ऊर्जा म्हणजे मानवतेसाठी हरित स्रोत, सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारी ऊर्जा ठरेल.

कल्हम सेंटर फॉर फ्यूजन एनर्जी येथे जेट प्रयोगशाळा आहे. तिथे घुमटाकार आकाराचे यंत्र आहे. त्याला 'टोकामक' असे नाव देण्यात आले आहे. हे यंत्र जगात सर्वात शक्तिशाली आहे. यामध्ये ड्युटिरियम, ट्रिटियमचे प्रमाण अल्प आहे. सूर्याच्या केंद्रातील उष्णतेच्या तुलनेत या संयंत्राला दहा पट अधिक उष्ण करण्यात आले.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT