Star 
विश्वसंचार

Star : तार्‍याला गिळत असलेले कृष्णविवर

Arun Patil

वॉशिंग्टन : प्रचंड आकर्षणशक्ती असलेल्या कृष्णविवरांच्या तडाख्याने प्रकाशकिरणही सुटू शकत नाही. (star) त्यामुळेच अशा कृष्णविवरांचा छडा लावणेही कठीण बनलेले असते. अनेक तारे (Star) अशी कृष्णविवरे गिळंकृत करीत असतात. तार्‍यांमधील वायू या कृष्णविवरात गडप होतो आणि त्यामुळे तीव्र रेडिएशन बाहेर पडते. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या खगोलशास्त्रज्ञांनी हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून एका तार्‍याचे शेवटचे क्षण रेकॉर्ड केले आहेत. हा तारा एका कृष्णविवराने गिळंकृत केला.

अशा प्रकारच्या घटनांना 'टायडल डिसरप्शन इव्हेंट' असे म्हटले जाते. एखादा भटकता तारा (Star)कृष्णविवराच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात येतो त्यावेळी काय घडते हे जाणून घेण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ हबल अंतराळ दुर्बिणीच्या सहाय्याने प्रयत्न करीत होते. आता 'नासा'ने याबाबतचे निष्कर्ष सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल म्हणजेच शक्तिशाली कृष्णविवर जवळ आलेल्या तार्‍याला नष्ट करून त्याचे रुपांतर एखाद्या डोनटसारखे करीत असताना दिसतो.

अर्थातच या 'डोनट' चा किंवा आपल्याकडील मेदुवड्यासारखा आकार हा एखाद्या सौरमंडळाइतका मोठा होता. 'इएसओ 583-जी004' नावाच्या आकाशगंगेतील तार्‍याला (star) या कृष्णविवराने गिळंकृत केले. या आकाशगंगेच्या केंद्रात सुमारे 300 प्रकाशवर्ष अंतरावर हा तारा आहे. या तार्‍याच्या प्रकाशाचे अध्ययन करण्यासाठी संशोधकांनी हबलच्या शक्तिशाली अल्ट्राव्हायलेट किरणांच्या संवेदनशीलतेचा वापर केला. 'नासा'ने या घटनेचे एक अ‍ॅनिमेशन टि्वटरवर शेअर केले आहे.

-हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT